जवाहर
नवोदय विद्यालयाची 9 जानेवारीला परीक्षा
Ø प्रवेश पत्र
तालुकानिहाय वितरीत
वर्धा,दि.01- जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा शनिवार, दिनांक
9 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात होणार आहे.
सर्व तालुक्यात एकुण 22 परीक्षा केंद्र आहेत. प्रत्येक तालुक्यातील निवड चाचणी
परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र प्राचार्य, जवाहर नवोदय
विद्यालय, सेलू काटे, वर्धा यांच्याकडून गटशिक्षणाधिकारी,पंचायत समिती,शिक्षण
विभाग येथे तालुक्यानिहाय पोहचविण्यात आले आहेत. तरी संबधित पालकांनी याची दखल
घ्यावी. ज्या विद्यार्थ्याना प्रवेश पत्र मिळाले नसेल त्यांनी दिनांक 7
जानेवारीपर्यंत सेलू काटे येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क
साधावा, असे आवाहन विद्यालयातर्फे करण्यात आले आहे.
000000
तूर,उडीदसाठी भारतीय
खाद्य महामंडळ नोडल एजन्सी
वर्धा,दि.01 - शेतक-यांकडून तूर, उडीद
खरेदी करण्यासाठी भारतीय खाद्य महामंडळाला नोडल एजन्सी म्हणून समाविष्ट केले
आहे. महामंडळ तूर,उडीद राज्य सरकारीची संस्था महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह मार्केटिंग
फेडरेशनद्वारा खरेदी करत आहे. खरेदी करण्यासाठी स्वच्छ उत्पादन मंडीत आणणे. भारतीय
अन्न महामंडळ लिलावामध्ये सहभाग घेईल. जेणेकरुन शेतक-यांना त्यांच्या उत्पादनाला
चांगला भाव मिळेल. शेतक-यांनी 7/12 उतारा, बँक खाते माहिती घेऊन यावे जणेकरुन
पैसे RTGS
द्वारा किंवा क्रॉस चेक द्वारा अदा करता येतील. खरेदीला मिळणा-या प्रतिसादावरुन
आणखी मंडी निवडल्या जातील, असे महामंडळातर्फे कळविण्यात आले आहे.
भारतीय अन्न महामंडाळाव्दारे
खाली दिलेल्या दर्जाची तूर आणि उडीद खरेदी केली जाईल.
उडीद -
अ.क्र.
|
अपवर्तक
|
कमाल मर्यादा
|
1
|
बाह्य पदार्थ
|
दाण्यांच्या वजनाच्या 2.00टक्के
|
2
|
मिश्र पदार्थ
|
दाण्यांच्या वजनाच्या 3.00 टक्के
|
3
|
अन्नधाण्याचे
दाणे
|
दाण्यांच्या वजनाच्या 1.00 टक्के
|
4
|
खराब,किंचित खराब
|
दाण्यांच्या वजनाच्या 3.00 टक्के़
|
5
|
तुटलेले,
विभागलेले, साल नसलेले
|
दाण्यांच्या वजनाच्या 3.00 टक्के़
|
6
|
पोखरलेली डाळ
|
दाण्यांच्या वजनाच्या 3.00 टक्के़
|
7
|
आर्द्रता
|
दाण्यांच्या वजनाच्या 12.0 टक्के़
|
8
|
अपरीपक्व आणि
आकसलेले
|
दाण्यांच्या वजनाच्या 3.00 टक्के़
|
तूर-
अ.क्र.
|
अपवर्तक
|
कमाल मर्यादा
|
1
|
बाह्य पदार्थ
|
दाण्यांच्या वजनाच्या 2.00टक्के
|
2
|
मिश्र पदार्थ
|
दाण्यांच्या वजनाच्या 3.00 टक्के
|
3
|
अन्नधाण्याचे
दाणे
|
दाण्यांच्या वजनाच्या 1.00 टक्के
|
4
|
खराब,किंचित खराब
|
दाण्यांच्या वजनाच्या 3.00 टक्के़
|
5
|
तुटलेले,
विभागलेले, साल नसलेले
|
दाण्यांच्या वजनाच्या 3.00 टक्के़
|
6
|
पोखरलेली डाळ
|
दाण्यांच्या वजनाच्या 3.00 टक्के़
|
7
|
आर्द्रता
|
दाण्यांच्या वजनाच्या 12.0 टक्के़
|
8
|
अपरीपक्व आणि
आकसलेले
|
दाण्यांच्या वजनाच्या 3.00 टक्के़
|
00000
No comments:
Post a Comment