Tuesday 20 September 2011

कर्ज नसलेल्या शेतक-यांना राष्ट्रीयकृत बँकामार्फत कर्ज वितरण पिक कर्ज वाटपाची मुदत आता 15 ऑक्टोंबर पर्यंत


     महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक  जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.20 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------

वर्धा,दि.20-राज्य सरकार व भारतीय रिजर्व बँकेच्या आदेशाप्रमाणे वर्धा जिल्ह्यातील सर्व थकित नसलेल्या शेतक-यांना सर्व राष्ट्रीयकृत बँका मार्फत कर्ज देण्यात येणार असून ज्या शेतक-यांनी अजून पर्यंत कर्जाची उचल केलेली नाही त्या सर्व शेतक-यांनी जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेशी संपर्क साधावा. पिक कर्ज वाटपाची मुदत 30 सप्टेंबर 2011 ऐवजी आता 15 ऑक्टोंबर 2011 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
तसेच शेत मजूरांसाठी त्यांचे आवश्यकतेनुसार रु. दहा हजार ओव्हरड्राफ्ट शेत मजूरांच्या स्वत:च्या जमानतीवर देण्याची मुभा देण्यात येणार आहे. ज्या शेत मजूरांचे खाते नसतील अशा शेत मजूरांनी त्यांच्या सेवाक्षेत्रात येणा-या राष्ट्रीयकृत बँकेत नवीन बचत खाते उघडून या योजनेचा लाभ घ्यावा. या सूचना सर्व राष्ट्रीयकृत बँकेच्या सर्व शाखा व्यवस्थापकांना दिलेल्या आहेत.
शेतमजूरांनी जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन सदर्हू योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक डोंगरे यांनी  केले आहे.
                  0000000

No comments:

Post a Comment