Friday 23 September 2011

ज्येष्ठ नागरीकासाठी मोफत रोगनिदान व उपचार शिबीराचे आयोजन


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक      जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.23 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
     वर्धा, दि.23- केंद्रशासन व महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये वर्धा जिल्ह्याची राष्ट्रीय वयस्क सुश्रूषा कार्यक्रम राबविण्यासाठी विशेष बाब म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यानुसार      1 ऑक्टोंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे. याबाबत वर्ष 2011 साठी ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सुश्रृषा अशी मध्यवर्ती संकल्पना आहे.
     वृध्द व्यक्तींसाठी विशेष मोफत रोगनिदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले असून, शिबीराचे स्थळ, दिनांक, रुग्ण नोंदणी वेळ आणि रुग्ण तपासणी वेळ खालील प्रमाणे आहे.
     उपजिल्हा रुग्णालय, आर्वी, येथे दि. 29 सप्टेंबर 2011 रोजी उपजिल्हा रुग्णालय,हिंगणघाट येथे दि. 30 सप्टेंबर 2011 रोजी, आणि कस्तूरबा बी.एड.कॉलेज,(ग्रामपंचायत जवळ),बोरगांव (मेघे) त.जि.वर्धा येथे अनुक्रमे रुग्ण नोंदणी वेळ सकाळी 9 ते 10 पर्यंत आणि रुग्ण तपासणी वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.
या शिबीरामध्ये वृध्द व्यक्तींना होणा-या कॅन्सर, उच्च रक्तदाब, हृदयरोग, लकवा, वातरोग, कंपवात, स्मृतीभ्रंष, अल्झेमर आजार, मानसिक रोग, नेत्ररोग, हर्निया, हायड्रोसील, लघवीचा त्रास,मधूमेह  या आजाराबद्दल तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी सोबत रक्त लघवी विषयी प्रयोगशाळा तपासणी मोफत करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य संपन्न जिवनशैली, राष्ट्रीय वयस्क सुश्रृषा कार्यक्रम व वृध्दांना होणा-या विविध आजारांच्या प्रतिबंधनाबद्दल तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत सामान्य रुग्णालय, वर्धा येथील बाह्यरुग्ण विभागामध्ये सकाळी 9 ते दुपारी 12.30 या वेळे दरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विषयक तपासणीसाठी व राष्ट्रीय कॅन्सर (कर्करोग),डायबीटिज (मधूमेह),कार्डीओ व्हॉस्कुलर डिसीझेस(हृदयरोग),स्ट्रोक (लकवा),प्रतिबंधन व उपचार कार्यक्रमांतर्गत (एन.पी.सी.डी.सी.एस.) विशेष तपासणी कक्ष सुरु करण्यात आलेले आहेत.
     जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी सदर उपचार शिबीराचा व आरोग्य सेवा सुविधांचा योग्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के.झेड.राठोड यांनी केलेले आहे.
                          000000



No comments:

Post a Comment