Tuesday 20 September 2011

सामाजिक व आर्थिक जात सर्व्हेक्षण चे कार्य 2 ऑक्टोंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत


           महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक            जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि. 20 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
         
वर्धा,दि.20-केन्द्र शासनाने सामाजिक आर्थिक जात सर्व्हेक्षण करण्याचे निश्चित केले असून, वर्धा जिल्ह्यात ग्रामीण क्षेत्रामध्ये हे सर्व्हेक्षण दिनांक 2 ऑक्टोंबर 2011 ते 17 नोव्हेंबर 2011 या कालावधीत घेण्यात येणार आहे.
या सर्व्हेक्षणाकरीता वर्धा जिल्ह्यामध्ये 709 प्रगणक व     119 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली असून, त्यांचे मार्फत सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्रथमच हे सर्व्हेक्षण संगणकाच्या सहाय्याने करण्यात येणार आहे. या सर्व्हेक्षण मध्ये निश्चित करण्यात आलेली प्रश्नावली ही वृत्तपत्रातुन तसेच पंचायत समिती व ग्राम पंचायतच्या सुचना फलकावर प्रसिध्द करण्यात येईल. वर्धा जिल्ह्यातील सर्व नागरीकांना या सर्व्हेक्षणा मध्ये आपल्या कुटूंबियाची योग्य ती माहिती संबंधीतास देवुन सहकार्य करण्याबाबत जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी आवाहन केले आहे.
                     0000000

No comments:

Post a Comment