Thursday 22 September 2011

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार योजनेसाठी प्रस्ताव आमंत्रित


  महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि. 22 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
          
वर्धा,दि.22-राज्यातील सामाजिक वनीकरणाच्या वन्नेत्तर क्षेत्रातील वृक्षारोपण व संवर्धन या मध्ये उत्कृष्ठ काम करणा-या व्यक्ती व संस्था यांना सन्मानित करण्यासाठी देण्यात येणा-या महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्कार योजनेचे नाव यापुढे सुधारीत करण्यात आले असून, आता या योजनेचे नाव छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार योजना असे करण्यात आले आहे. या योजने अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणा-या व्यक्ती व संस्था यांना सन्मानित करण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्ती  किंवा संस्थाकडून विहीत नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
     या योजने नुसार पुरस्कार राज्य स्तर आणि महसूल विभाग स्तर अशा दोन स्तरावर दिले जाणार आहेत. दोन्ही स्तरावर व्यक्ती, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, ग्राम/विभाग/जिल्हा इत्यादी संवर्गामध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत. महसूल विभाग स्तरावर आणि राज्य स्तरावर देण्यात येणा-या संवर्ग निहाय पुरस्काराचा तपशिल खालील प्रमाणे आहे.
     महसूल विभाग स्तर (वृत्त) संवर्ग निहाय पुरस्कारामधे व्यक्ती,ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, तसेच ग्राम/विभाग/जिल्हा साठी प्रत्येकी प्रथम पुरस्कार 25,000 रुपये, आणि व्दितीय प्रत्येकी पुरस्कार रु. 15,000 चे देण्यात येणार आहे.
     राज्यसतरावर संवर्ग निहाय पुरस्कारामधे व्यक्ती, ग्रामपंचायत ,शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था तसेच ग्राम/विभाग/जिल्हा साठी प्रत्येकी प्रथम पुरस्कार 50,000 रु. चे, प्रत्येकी व्दितीय पुरस्कार 40,000 रु.आणि प्रत्येकी तृतीय पुरस्कार रु.30,000 चे देण्यात येणार आहेत.                                
पुरस्कारासाठी प्राप्त होणा-या प्रस्तावामधून महसुल विभाग स्तरावरुन प्राप्त झालेल्या प्रथम व व्दितीय क्रमांकाच्या विजेत्यामधून राज्यस्तरीय विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. राज्यस्तरावर निवड झालेले व्यक्ती अथवा संस्था यांना महसूल विभाग स्तरावरील देय ठरणारी पुरस्काराची रक्कम राज्य स्तरावरील प्रदान करण्यात येणा-या पुरस्कार रकमेमधून वजा करुन उर्वरित रक्कम प्रदान करण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत पुरस्कार प्राप्त व्यक्ती/ संस्था यांना देण्यात येणारी पुरस्काराची रक्कम ही राज्यस्तरावरील पुरस्काराच्या रकमेपेक्षा अधिक असणार नाही.
     यासाठी जिल्ह्यातील इच्छुक व्यक्ती,ग्रामपंचायत,शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था यांनी त्यांचे प्रस्ताव उपसंचालक, सामाजिक वनीकरण विभाग, वर्धा यांचकडे सादर करावे. प्राप्त होणा-या प्रस्तावाची छाणणी करुन पुढील कार्यवाहीसाठी मुख्य वनसंरक्षक व उपमहासंचालक सामाजिक वनीकरण वृत्त, नागपूर यांचेकडे पाठविण्यात येतील.
     प्रस्तावाची छाननी करुन निवड करण्यात आलेल्या विजेत्या पुरस्काराची रक्कम राष्ट्रीय बचत पत्रे, स्मृती चिन्ह व प्रशस्ती पत्र स्वरुपात पुरस्कार वितरण समारंभासाठी आयोजित करण्यात येणा-या कार्यक्रमामध्ये करण्यात येईल.
     इच्छुक व्यक्ती, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था यांनी जास्तीत जास्त संख्येत त्यांचेकडील प्रस्ताव उपसंचालक सामाजिक वनीकरण विभाग, वर्धा यांचेकडे 15 दिवसाच्या आत सादर करावे. अधिक माहितीसाठी उपसंचालक सामजिक वनीकरण विभाग, वर्धा किंवा संबंधीत तालुक्यातील लागवड अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. असे उपसंचालक सामाजिक वनीकरण विभाग, वर्धा यांनी कळविले आहे.
                            000000



No comments:

Post a Comment