Wednesday 21 September 2011

1 ऑक्टोंबर हा आंतरराष्ट्रीय वयोवृध्द दिन साजरा करण्याचे आवाहन


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि. 21 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
           
वर्धा,दि.21-संपूर्ण जगात 1 ऑक्टोंबर हा आंतरराष्ट्रीय वयोवृध्द दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सुविधा ही थिम ठरवून त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यात सदर दिन साजरा करण्यात येणार आहे.
     राज्यात सदर दिन साजरा करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, पंचायत राज, नगरपालिका, नेहरु युवक केंद्र, शैक्षणिक संस्था, (त्यांच्या एनएसएस युनिटसह) आणि विशेषत: ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी काम करणा-या स्वयंसेवी संस्थांना सहभागी करुन जिल्हा व तालुका पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करावयाचे आहे. त्यामध्ये आंतराष्ट्रीय वयोवृध्द दिना निमित्त वयोवृध्दांच्या मालमत्तेचे व जीवनाची सुरक्षा, आर्थिक सुरक्षा व स्थैर्य, स्थावर मालमत्तेपासून नियमीतपणे उत्पन्नाची उपलब्धता, वयोवृध्द लोकांचे बचतगट  स्थापून उत्पन्नाची साधने उपलब्ध करुन देणे, सामाजिक सुरक्षा उपलब्ध करुन देणे, वयोवृध्दांना शिक्षणाप्रती जागृती निर्माण करणे तसेच वयोवृध्दांसाठीच्या आरोग्या विषयी विविध उपाययोजना करणे आदीचा समावेश आहे.
     सदर्हू कार्यक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,मुख्याधिकारी नगरपालिका, गटविकास अधिकारी पंचायत समिती व त्यांचे आरोग्य अधिकारी, विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी, समाज कल्याण अधिकारी गट अ जिल्हा परिषद, वृध्दाश्रम चालविणा-या संस्था, ज्येष्ठ नागरिक क्षेत्रात कार्य करणा-या स्वयंसेवी संस्था, लायन्स क्लब, रोटरी क्लब इत्यादी व इतर सामाजिक संस्था व संघटना यांचे सहकार्याने 1 ऑक्टोंबर रोजी आंतरराष्ट्रीय वयोवृध्द दिन म्हणून साजरा करावा. या निमित्ताने आई,वडील व ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 व नियम 2010 च्या तरतुदींची मोठ्या प्रमाणावर प्रसिध्दी करण्यात यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.
                           00000

No comments:

Post a Comment