Tuesday 20 September 2011

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाच्या नुकसान भरपाईबाबत आवाहन


           महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक           जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि. 20 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
           
      वर्धा,दि.20- जिल्ह्याचे कृषि विभागा मार्फत जुलै 2008 ते ऑक्टोंबर 2010 या कालावधीत झालेल्या नैसर्गीक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाले अशा 50 टक्के चे वर नुकसान झालेल्या  क्षेत्राला मदत वाटपाची कार्यवाही सुरु आहे.
जुलै 2008 ते ऑक्टोंबर नोव्हेंबर 2010 या कालावधीत नैसर्गीक आपत्तीमुळे 57074.18 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे 50 टक्के चे वर नुकसान झाले त्याकरीता शासनाकडून आतापर्यंत जिल्ह्याला वाटपा करीता रुपये 25.47 कोटी रुपये प्राप्त झालेत व प्राप्त रक्कमेपैकी दिनांक 15 सप्टेंबर 2011 पर्यंत रुपये 22.11 कोटी मदत निधीचे वाटप 129126 शेतक-यांना झाले आहे. प्राप्त निधीपैकी अजुनही जवळपास रुपये 3.36 कोटी निधीचे वाटप होणे बाकी आहे.
ब-याचशा शेतक-यांची जमीन गावात असते परंतु शेतकरी शहरात राहात असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क न झाल्यामुळे त्यांचे बँक खाते नंबर संबंधित तालुका कृषि अधिकारी यांना न मिळाल्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम त्यांचे बँक खात्यात जमा करता आली नाही किंवा काही शेतक-यांनी त्यांचे बँक खाते क्रमांक तालुका कृषि अधिकारी कार्यालयास दिले परंतु मागील बरेच वर्षापासून त्या खात्यात व्यवहार होत नसल्यामुळे असे खाते रद्द झाल्याचे निदर्शनास आले आहे. व त्यामुळे मोठी रक्कम वाटपा अभावी शिल्लक आहे.            
ज्या शेतक-यांच्या शेती पिकाचे जुलै 2008 ते ऑक्टोंबर नोव्हेंबर 2010 या कालावधीत 50 टक्के चे वर नुकसान झाले व ज्यांची नावे सर्व्हेक्षण  अहवालात आहे अशा शेतक-यांनी तात्काळ नजिकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी किंवा गावच्या कृषि सहाय्यकाशी दिनांक 30 सप्टेंबर 2011 पर्यंत संपर्क करुन आपले बँक खाते पासबुक दाखवुन खाते नंबर नोंद करावा म्हणजे त्यांचे खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करता येईल. दि.30 सप्टेंबर 2011 पर्यंत राहिलेले वाटप पुर्ण करुन शिल्लक राहणारी रक्कम शासनास परत करण्यात येईल. त्यानंतर येणा-या शेतक-यांचा हक्क राहणार नाही याची नोंद घ्यावी. असे आवाहन जिल्हा कृषि अधिकारी भाऊसाहेब  ब-हाटे यांनी केले आहे.
                      00000

No comments:

Post a Comment