Friday 23 September 2011

कोरडवाहू शाश्‍वत शेती विकास कार्यक्रम संपन्न


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.23 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
          
वर्धा,दि.23- कोरडवाहू शाश्‍वत शेती विकास कार्यक्रमांतर्गत  या वर्षासाठी नुकतीच मौजे तळणी येथील शेतक-यांची प्रशिक्षण सभा घेण्यात आली. या कार्यक्रमातंर्गत शेतीमधुन शेतक-यांना कायमस्वरुपी आर्थिक स्त्रोत निर्माण व्हावा व त्या दृष्टीने शेती आधारीत पिक पध्दती कृषि , फलोत्पादन, कृषि भाजीपाला वर्गीय  पिके, कृषी दुग्ध व्यवसाय, भाजीपाला, कृषी शेळी पालन, कृषी कुक्कुट पालन, शेळी पालन इत्यादी प्रकारच्या शेती पध्दती पैकी शेतक-यांचे एक पिक हातचे गेले तरी दुस-या व्यवसायातुन त्यांना उत्पन्न होईल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळणार नाही असे सांगितले.
 यावेळी  शेतक-यांचे गट स्थापन करणे, गटांना प्रशिक्षण देणे, त्यांना शेतीपूरक अवजारे पुरविणे, नविन तंत्रज्ञान आत्मसात करणे,शेती विषयक माहिती दिली. अभ्यास दौरे आयोजित करणे या बाबीचा समावेश आहे. त्याकरीता तळणी (भागवत) या गावाची निवड करण्यात आली आहे.
या प्रशिक्षणाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे, तालुका कृषि अधिकारी एस.डब्लु निंघोट, मंडळ कृषि अधिकारी कडू व कृषि सहाय्यक तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.
                        00000

No comments:

Post a Comment