Friday 23 September 2011

पिकावरील किड व रोग सर्वेक्षण पंधरवाडा मोहिम


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.23 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
      वर्धा, दि.23- सोयाबिन पिक संरक्षण पंधरवाडा अंतर्गत मौजे तळणी भागवत येथे नुकतीच शेतक-यांसाठी सर्वेक्षण पंधरवाडा मोहीम राबविण्यात आली. त्यामधे सोयाबिन व कपाशी पिकावर येणा-या किडी, मित्रकिडी व त्यांची ओळख, किडीचा जीवनक्रम आणि नियंत्रणाचे उपाय या बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.
     पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे जमिनीमध्ये दिलेले खत पाण्याव्दारे निघून जाते. ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकावर मागवा,तुडतुडे व पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीच्या नियंत्रणासाठी ट्रायझोफॉस 40 इ.सी., 30 मिली 10 लिटर किंवा फिप्रोनिल 5 टक्के 20 मिली 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. तसेच पांढ-या माशीसाठी स्टीकी ट्रॅप्स लावण्यात यावे. कपाशीवर लाल्या येवू नये त्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट 1 टक्के डिएपी 2 टक्के सोबत बुरशी नाशकाची फवारणी करावी. असे या मोहीमेत उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी सांगितले.
     यावेळी सभेला तालुका कृषि अधिकारी एस.डब्लु.निघोट, मंडळ कृषि अधिकारी जी.पी.कडू, कृषि सहाय्यक व शेतकरी बांधव उपस्थित होते.
                             00000

No comments:

Post a Comment