Wednesday 21 September 2011

नवीन मतदार नोंदणी व छायाचित्र ओळखपत्र देण्यासाठी विशेष मोहीम


           महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक              जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि. 21 सप्टेंबर 2011
---------------------------------------------------------------------------------

वर्धा,दि.21-नविन मतदार नोंदणी व छायाचित्र ओळखपत्रा- बाबतची विशेष मोहीम दिनांक 1 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर 2011 या कालावधीत होणार आहे. नवीन मतदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी  तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जयश्री भोज यांनी केले आहे.
नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना 6 मध्ये संपूर्ण माहिती भरुन आणि नजीकच्या काळात काढलेले रंगीत छायाचित्र जोडून अर्जदारांनी अर्ज करावेत. मतदार यादीतील नावाबाबत आक्षेप व नाव गाळण्याकरीता नमुना क्र.7 भरावा. मतदार यादीतील नोंदीच्या तपशिलमध्ये करावयाच्या दुरुस्ती करीता नमुना क्र.8 भरावा. मतदार यादीतील नोंदीचे एका ठिकाणावरुन दुस-या ठिकाणी स्थलांतर करण्याकरीता नमुना क्र. 8 अ भरावा.
अर्जदारांनी नमुना 6,7,8 व 8 अ चा अर्ज विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात नियुक्त पदनिर्देशित अधिका-याकडे मतदान केंद्राच्या ठिकाणी दिनांक 1 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर 2011 दरम्यान सादर करावेत.
     44- आर्वी विधानसभा मतदार संघासाठी मतदार नोंदणी अधिकारी उपविभागीय अधिकारी,आर्वी दूरध्वनीक्र. 07157-222028, 45-देवळी विधानसभा मतदार संघासाठी मतदार नोंदणी अधिकारी  उपविभागीय अधिकारी,वर्धा दूरध्वनी क्र.07152-242561,46-हिंगणघाट विधानसभा मतदार संघासाठी मतदार नोंदणी अधिकारी उपविभागीय अधिकारी,हिंगणघाट दूरध्व.क्र.07153-244080, 47-वर्धा विधानसभा मतदार संघासाठी उपविभागीय अधिकारी,वर्धा दूरध्व.क्र.07152-242561 असा आहे.
     मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे नमुना 6,7,8 व 8 अ सादर करताना काही अडचणी आल्यास उपरोक्त वर नमूद केलेल्या मतदार नोंदणी अधिका-याकडे संपर्क साधावा.   
                           000000

No comments:

Post a Comment