Thursday 22 November 2012

ग्रंथ प्रदर्शनाच्‍या माध्‍यमातून वाचनाची चळवळ अधिक समृध्‍द होईल - संजय भागवत


     
              * महाराष्‍ट्राचा सांस्‍कृतिक  ठेवा उपलब्‍ध
         * 200दिवाळी अंक वाचकांच्‍या  भेटीला

       वर्धा, दि. 22 – युवकांमध्‍ये वाचनाची आवड कमी होत असतांना, युवकांनी ग्रंथ प्रदर्शनास भेट देवून,  ग्रंथप्रदर्शनाच्‍या माध्‍यमातून आवडते ग्रंथ वाचकापर्यंत पोहचविणे सहजसुलभ आहे. दिवाळी अंक ही वाचकांना मेजवाणी असून, प्रत्‍येकांनी वाचनाची आवड जोपासावी,असे आवाहन  अपर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी केले आहे.
      शासकीय जिल्‍हा ग्रंथालयात दिवाळी विशेषांकांचे व दूर्मिळ ग्रंथाच्‍या  प्रदर्शनीचे उदघाटन अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी  संजय भागवत यांच्‍या हस्‍ते थाटात पार पडले त्‍यावेळी ते बोलत होते.
          अध्‍यक्षस्‍थानी विभागीय ग्रंथालय संघाचे अध्‍यक्ष डॉ. गजानन कोटेवार तर प्रमुख अतिथी उपविभागीय पेालीस अधिकारी विक्रम साळी, जिल्‍हा नियेाजन अधिकारी प्रकाश डायरे उपस्थित होते.
          दिवाळी विशेषांकाचे सध्‍याचे स्‍वरुप खूप  बदलते असून, ज्ञानाच्‍या दृष्‍टीनेही ते खूप मोलाचे आहे. वाचकांनी याचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन यावेळी करण्‍यात आले.
              स्‍वप्‍नपूर्तीसाठी आता ग्रंथालयाच्‍या अभ्‍यासिकेत गर्दी !
        शासकीय ग्रंथालयामध्‍ये केवळ ललित साहित्‍य म्‍हणजे कथा, कादंबरी, कविता या लेखन प्रकाराचीच पुस्‍तके मिळत असल्‍याने नोकरीचे स्‍वप्‍न बघणारे युवक-युवती नाराजी व्‍यक्‍त करत होते. परंतु वर्धा येथील शासकीय जिल्‍हा  ग्रंथालयाने या ललित साहित्‍या सोबतच स्‍पर्धा परिक्षांचे संदर्भ ग्रंथ मोठ्या प्रमाणात खरेदी केली. एवढेच नव्‍हे तर स्‍वतंत्र अभ्‍यासीका तयार करुन ग्रंथालयाचा चेहरा- मोहरा बदलविला. तत्‍कालीन निवासी उपजिल्‍हाधिकारी  राजेश  खवले यांनी तर या ग्रंथालयाकडे विशेष लक्ष दिले होते. त्‍याचाच चांगला परिणाम सध्‍या दिसून येत आहे. ग्रंथपाल सुरज मडावी यांनी होतकरु विद्यार्थ्‍यांना विशेष मार्गदर्शन करीत असल्‍याने नोकरीच्‍या स्‍वप्‍नपूर्तीसाठी  आता मोठी गर्दी वाढल्‍याचे दिसून येते.
                                                                                                                       
        अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी मोबाईलचे उदाहरण देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ज्ञानासाठी  होत असताना  युवकांनी सतत वाचनाची आवड जोपासावी व आपले ज्ञान समृध्‍द करण्‍यासाठी  युवकांनी   ग्रंथांचा वापर करावा असेही ते म्‍हणाले.
            उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.साळी म्‍हणाले , मी कृषी विभागात नोकरी  करीत असताना वर्धा शासकीय ग्रंथालयाचा पुरेपुर उपयोग घेतला. साहित्‍य समाज संस्‍कृतीच्‍या समृध्‍दीसाठी  ग्रंथप्रेम युवापिढीसाठी प्रेरणादायी आहे. स्‍पर्धा परिक्षांमधून यश मिळवायचे असेल तर विद्यार्थ्‍यांनी ग्रंथालयाच्‍या अभ्‍यासिकेचा वापर करावा त्‍यातून आदर्श व्‍यक्तिमत्‍व साकार होऊ शकेल. असा विश्‍वास व्‍यक्‍त केला.
         शासकीय ग्रंथालय अद्ययावत करण्‍यासाठी आवश्‍यक निधी देण्‍यात येईल अशी माहिती नियोजन अधिकारी प्रकाश डायरे यांनी दिली.
          अध्‍यक्ष डॉ. कोटेवार यांनीही विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले.
          प्रारंभी ग्रंथपाल सुरज मडावी यांनी स्‍वागत करुन प्रास्‍ताविकास ग्रंथालयात असलेल्‍या  ग्रंथसंपदेची व ग्रंथालयातर्फे राबविण्‍यात  येत असलेल्‍या  उपक्रमांची  माहिती दिली.
            कार्यक्रमाचे संचालन विजय मुळे तर आभार मयूर काथवटे यांनी  मानले. यशस्‍वीतेसाठी श्रीमती मिश्रा,मख, खडतकर व अन्‍य कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. यावेळी वाचक व विद्यार्थी  बहुसंख्‍येने उपस्थित होते.
                                                                000000 

No comments:

Post a Comment