Tuesday 6 March 2012

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेमध्‍ये श्रम संस्‍कार शिबीर


       वर्धा, दि. 6- येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेत राष्‍ट्रीय सेवा योजने अंतर्गत विशेष श्रम संस्‍कार शिबीराचे आयोजन करण्‍यात आले. यावेळी विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन केले. भारतीय संविधान व समताधिष्‍टीत समाज निर्मिती या विषयावर प्राध्‍यापक प्रमोद नारायणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ते म्‍हणाले की भारतीय घटना परिपक्‍व आहे, परिपूर्ण व स्‍पष्‍ट आहे. ही घटना भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनविलेली आहे. यामध्‍ये कायदे विषयक नागरिकांचे अधिकार, कर्तव्‍य, शिक्षण, शासनप्रणाली, मतदनाचा अधिकार व इतरही महत्‍वाच्‍या बाबींचा स्‍पष्‍टपणे व सविस्‍तरपणे नमूद व विषद केलेल्‍या आहे.
     याप्रसंगी मार्गदर्शकांनी स्‍वयंसेवकांना संविधानावर प्रश्‍न विचारले असता अचूक उत्‍तर देणा-या रोशण बावणेर या स्‍वयंसेवकाला संविधानाची प्रत भेट देण्‍यात आली.
     याप्रसंगी  मार्गदर्शकांनी आवर्जून सांगितले की संविधानाची प्रत प्रत्‍येकाने जवळ  ठेवावी व  वाचावी कारण भारतीय संविधान पूर्णपणे समजावून घेणे सर्व भारतीय नागरिकांसाठी आवश्‍यक आहे.
     यावेळी कार्यक्रम अधिकारी आर.झोड.रंधई, गटनिदेशक ए.एस.मधुपवार, शिल्‍पनिदेशक व्‍ही.डी.भगत,ए.आर.पांडव, जी.एल.काळे, एच.पी.चव्‍हाण,ए.पी.मारतीवार,
पी.एच.बोबडे, एस.पी.पाचघरे, के.पी.गोवारकर व सर्व स्‍वयंसेवक उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे संचालन  पुनम वानरे तर आभार प्रदर्शन राहूल भोयर यांनी केले.
                              00000

No comments:

Post a Comment