Wednesday 1 June 2016

              शेतक-यांनी  सोयाबिन बियाण्‍याचा 
         पेरणीसाठी वापर करतांना काळजी घ्‍यावी.
Ø शेतक-यांनी बियाण्‍याची उगवन क्षमता तपासावी  
Ø जिल्‍हयामध्‍ये सोयाबिन बियाणे उपलब्‍ध होणार
    वर्धा,दि.27- खरीप हंगाम 2016 करीता जिल्‍ह्यातील शेतक-यांनी स्‍वतःकडे उपलब्‍ध असलेल्‍या सोयाबीन बियाण्‍याचा वापर पेरणी करीता  वापरण्‍यास काही हरकत नाही. त्‍यामुळे शेतक-यांचे सोयाबीनचे बियाणे खरेदी वरील खर्च कमी होईल .सोयाबीन मध्‍ये सर्वच वाण हे सरळ वाण आहे. त्‍यामुळे अशा वाणाचे बियाणे प्रत्‍येक वर्षी बदल करण्‍याची आवश्‍यकता नसते. एकदा प्रमाणित  बियाणे वापरल्‍यानतंर त्‍यांच्‍या उत्‍पादनातून  येणारे बियाणे दोन ते तीन वर्षापर्यंत वापरता येते. परंतु घरचे बियाण्‍याची  पेरणी पूर्व उगवण क्षमतेची चाचणी करुन घेणे फार आवश्‍यक आहे. त्‍यामुळे चांगल्‍या उगवण क्षमतेची खात्री पटू शकते व पेरणी करतांना बियाण्‍याचे प्रमाण किती ठेवावे यांचा अदांज सुद्धा काढू शकतो.
                                      उगवण क्षमता तपासण्‍याची सोपी पद्धत
 यासाठी शेतक-यांनी स्‍वतःकडे असलेले सोयाबीन बियाण्‍याची  चाळणी  करुन त्‍यामधील काडी कचरा, खडे, लहान व फुटलेले दाणे वेगळे करावे. बियाणे चाळणी नंतर स्‍वच्‍छ झालेले वर्तमान पत्राचा एक पुरेसा कागद घेवून त्‍याला चार घड्या पाडाव्‍यात ज्‍यामुळे कागदाची जाडी वाढेल नंतर तो कागद पाण्‍याने ओला करावा व त्‍यानंतर  प्रत्‍येकी 10 बिया दाणे घेवून त्‍या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपत्राच्‍या टोकाच्‍या भागावर ठेवून त्‍याची गुंडाळी करावी. अशारीतीने 100 गुंडाळया   तयार कराव्‍यात व त्‍यासर्व एका पॉलीथीन पिशवीत चार दिवस तशाच ठेवाव्‍यात. चार दिवसानंतर त्‍या हळुहळु उघडून पाहून त्‍यामध्‍ये अंकुरीत झालेल्‍या बिया मोजाव्‍यात जर अकुरीत झालेल्‍या बियाची संख्‍या 80 असेल तर उगवण क्षमता 80 टक्‍के समजावी.
        अशा पद्धतीने सोयाबीन बियाण्‍याचे उगवण अंदाज घेता येतो. सोयाबीन बियाणेची उगवण क्षमता चांगली म्‍हणजेच 70 टक्‍के असेल तर शिफारस केलेल्‍या मात्रेनुसार प्रति हेक्‍टर 75 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे.जर उगवणक्षमता कमी असेल तर त्‍यांच्‍या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे.म्‍हणजे उगवणक्षमता 65 टक्‍के असेल तर 81 किलो बियाणे उगवणक्षमता 60 टक्‍के असेल तर 87.5 किलो बियाणे उगवणक्षमता 55 टक्‍के असेल तर 95.5 किलो बियाणे आणि उगवणक्षमता 50  टक्‍के असेल तर 105 किलो बियाणे प्रति हेक्‍टर क्षेत्रासाठी वापरावे. सोयाबीन ची प्रत्‍येक्ष पेरणी करतांना पुढील प्रमाणे अतिरिक्‍त काळजी घेण्‍याची गरज असते. त्‍यासाठी 75 ते 100 मी मी पर्जन्‍यमान झाल्‍यावरच सोयाबीनची पेरणी करावी. बियाण्‍याची पेरणी 3 ते 4 से.मी. खोली पर्यंत करावी त्‍यापेक्षा जास्‍त खोलीवर पेरणी करु नये.
   सोयाबीन बियाणे हे अत्‍यंत नाजूक असते कारण त्‍याचे बाह्यआवरण अत्‍यंत पातळ असून बियाण्‍यातील बिजाकुर व मुलद्रव्‍य हे बाह्य आवरणाच्‍या लगत असल्‍यामुळे सोयाबीन बीयाणे हातळतांना जास्‍तीत जास्‍त  काळजी घेणे गरजेचे असते त्‍यासाठी बियाण्‍याची वाहतूक, साठवणुक करतांना त्‍याची कमीतकमी आदळ आपट व हातळणी होईल याची क्षमता दक्षता घ्‍यावी.
          पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्‍यास 3 ग्रॅम थायरस या  औषधाद्वारे बुरशीजन्‍य रोगांपासून संरक्षणासाठी बिज प्रक्रीया करावी.तसेच  रायझोबियम व पी.एस.बी. या जीवाणु संवर्धकाची प्रत्‍येकी 200 ते 250 ग्रॅम प्रती 10 ते 15 किलो बियाण्‍यास प्रत्‍यक्ष पेरणीचे 3 तास अगोदर बीज प्रक्रीया करुन असे  प्रक्रीया केलेले बियाणे सावलीत वाळावावे व नंतर त्‍याची पेरणी करावी.
               जिल्‍ह्यामध्‍ये सोयाबीन बियाणे उपलब्‍ध होणार
   जिल्‍ह्यामध्‍ये सोयाबीनचे 110000 हेक्‍टर क्षेत्र पेरणीचे नियोजन करण्‍यात आलेले आहे. त्‍या करीता 57750  क्विंटल बियाण्‍याची आवश्‍यकता आहे. त्‍या अनुषंगाने सार्वजनिक व खाजगी कंपनीचे 60000 क्विंटल सोयाबीन बियाणे कृषी केंद्रामार्फत उपलब्‍ध होणार आहे. शेतक-यांना पेरणीच्‍या वेळीस बियाणे उपलब्‍ध करुन देण्‍यात येईल व शेत-यांना सोयाबीन बियाण्‍याची कमतरता भासणार नाही.

     नैसर्गिक अपत्‍ती मुळे शेतक-यांचे नुकसान होवू नये म्‍हणून चालु वर्षी सोयाबीन पेरणी करतांनी सोयाबीन पिकामध्‍ये शेतक-यांनी 6 ओळी नंतर ओळ तूर या प्रमाणे आंतरपिक घ्‍यावे. ज्‍यामुळे शेतक्‍-यांना अतिरिक्‍त उत्‍पन्‍न मिळेल व आपात कालीन परिस्‍थीतीत तूर आंतरपिक घेतल्‍यामुळे  फायदाही होईल पेरणीच्‍या अपेक्षीत नियोजनानुसार बि.टी कापूस बियाण्‍याचे वर्धा जिल्‍ह्याकरीता 10.08 लाख पाकीटाची आवश्‍यकता आहे. आता पर्यंत जिल्‍ह्यात 6.66 लाख बिटी कापूस बियाणे पॉकीटाचा पुरवठा झालेला आहे. व पेरणीच्‍या हंगामा पर्यंत मागणी प्रमाणे पुरवठा होणार आहे. व कपाशी बियाण्‍याच्‍या तुटवडा व टंचाई जाणवणार नाही असे आवाहन कृषी विकास अधिकारी, एस.एम खळीकर यांनी केलेले आहे. 

No comments:

Post a Comment