Wednesday 1 June 2016

              सामान्‍य जनतेला योजनाचा प्रत्‍यक्ष लाभ दया
- रामदास तडस
Ø केद्र सरकारला दोनवर्ष पूर्तीनिमित्‍त विशेष कार्यक्रम
Ø तरोडा येथे वाढीव पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन
Ø  
Ø माझा देश बदलतो आहे प्रदर्शनीचे आयोजन
Ø महिला व ग्रामस्‍याचा सहभाग
वर्धा,दि.26-केद्रातील शासनाला दोन वर्ष पूर्ण झाले असून या काळात शेतकरी, महिला , युवक तसेच सामान्‍य जनतेच्‍या कल्‍याणाच्‍या विविध योजनांची प्रत्‍यक्ष अमलबजावणी सुरु झाली आहे. शासनाच्‍या विविध योजना जनेतपर्यंत प्रभावीपणे पोहचून जनतेला प्रत्‍यक्ष लाभ मिळवून दया असे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले आहे.
            तरोडा येथे केंद्रशासनाच्‍या दोन वर्ष पूर्तीनिमित्‍त योजना आपल्‍या व्‍दारी या छायाचित्र प्रदर्शन तसेच विविध विभागाच्‍या योजनाची माहिती  थेट जनतेला मिळावी यासाठी आयोजित उपक्रमाचे उद्घघाटन खासदार रामदास तडस यांच्‍या हस्‍ते झाले त्‍या प्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
            क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्‍या वतीने आयोजित कार्यक्रमास आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्‍हा परिषदेचे प्रभारी मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्‍या महाराष्‍ट्र आणि गोवा राज्‍याच्‍या संचालिका प्रभावती आकाशी , जलंतंज्ञ माधव कोटस्‍थाने, तरोडा ग्राम पंचायतीच्‍या सरपंच सुनिता टिकले, उप सरपंच गणेश तिमांडे, जि.प. सदस्‍य किशोर चौधरी, मिलींद भेंडे, जिल्‍हा अधिक्षक ज्ञानेश्‍वर भारती, क्षे‍त्रीय प्रचार अधिकारी मनोज सोनोने विविध विभाग प्रमुख  विवेक मालूर यांची विशेष उपस्थिती होती.
            केंद्र सरकारच्‍या दोनवर्ष पूर्तीच्‍या निमित्‍ताने आयोजित कार्यकमात  बोलतांना खासदार रामदास तडस पुढे म्‍हणाले की, गेल्‍या दोन वर्षाच्‍या काळात केंद्रातील सरकारने सर्व घटकांसाठी कल्‍याणकारी योजनांची सुरुवात केली असून शेतक-यासाठी सिंचन तसेच पीक विमा योजना तसेच कौशल्‍य विकास योजना ते मेक इन इंडिया या सारख्‍या अनेक योजनांचा समावेश आहे. ज्‍या योजना केंद्र सरकारने सुरु केल्‍या त्‍या लोकांपर्यत पोहचणे गरजेचे असून हया योजना सामान्‍य माणसांपर्यत पोहोचविण्‍याचे आवाहन खा. तडस यांनी उपस्थितांना केले.
            या वर्षात 17 लाख नौक-या देण्‍याचा केद्र सरकारचा संकल्‍प असल्‍याचे सांगून खासदार रामदास म्‍हणाले की, सरकारने सिंचन प्रकल्‍प पूर्ण करण्‍यावर भर दिला असून शेतक-यांच्‍या शेतापर्यंत पाणी पोहचविण्‍याचा प्रयत्‍न सरकार करणार असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.
            यावेळी बोलतांना आमदार डॉ. पंकज भोयर म्‍हणाले की, केंद्र सरकारने दोन वर्षाची वाटचाल  केली असून लोकांच्‍या आशा-आकांशा पूर्ण करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.
            यावेळी केद्र सरकारच्‍या कृषी विषयक योजनांची माहिती जिल्‍हा कृषी अधिक्षक ज्ञानेश्‍वर भारती  यांनी यावेळी दिली. तसेच आरोग्‍यांच्‍या विविध योजनाबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्‍पना सुनतकरी यांनी दिली. क्षेत्रीय प्रचार महासंचालनालयाच्‍या महाराष्‍ट्र आणि गोवा राज्‍याच्‍या संचालिका श्रीमती प्रभावती  आकाशी यांनी या कार्यक्रमाची भुमिका स्‍पष्‍ट करुन क्षेत्रीय प्रचार कार्यालय करीत असलेल्‍या कामांबाबत माहिती  दिली.
            यावेळी तरोडा येथील पंजाब नॅशनल बॅकेच्‍या शाखेच्‍या वतीने किसान कार्डच्‍या माध्‍यमातून 36 लाख रुपयाचे कर्जाचे तसेच किसान कार्डचे वाटप करण्‍यात आले. कृषी विभाग, एकात्मिक बाल विकास प्रकल्‍प , आरोग्‍य विभाग, राष्‍ट्रीय जीवनज्‍योती कार्यक्रम तसेच इतर विभागाच्‍या वतीने प्रदर्शनी लावण्‍यात आले होते. यावेळी लीड बँकेचे प्रमुख विजय जांगडा यांनी माहिती दिली.
            केद्र सरकारच्‍या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्‍या अंतर्गत येणा-या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्‍या जाहिरात आणि दृष्‍य प्रचार संचालनालयाच्‍या वतीने माझा देश बदलतो आहे. पुढे जातो आहे.या संकल्‍पनेवर आधारीत विशेष चित्रमय प्रदर्शन सुध्‍दा लावण्‍यात आली होती.
            दोन दिवसीय या विशेष कार्यक्रमाच्‍या निमित्‍ताने घेण्‍यात आलेल्‍या विविध स्‍पर्धेच्‍या विजेत्‍यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आले. यापूर्वी सकाळी तरोडा गावातून एक जनजागृती रॅली काढण्‍यात आली यात ग्रामस्थ मोठया संख्‍येने उपस्थित झाले होते.
                        वाढीव पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन 
       सांसद आदर्श ग्राम असलेल्‍या तरोडा या गावचा सर्वागिण विकास करतांना रस्‍ते, पाणी, वीज व स्‍थानिक मुलभूत समस्‍या सोडविण्‍याला प्राधान्‍य दिल्‍याचे खासदार रामदास तडस यांनी यावेळी सांगितले.
       तरोडा येथील पिण्‍याच्‍या पाण्‍याचा प्रश्‍न कायमस्‍वरुपी सुटावा यासाठी 1 कोटी 74 लक्ष रुपये खर्चाच्‍या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन खासदार रामदास तडस यांच्‍या हस्‍ते झाले. तरोडा येथे बेरोजगार युवकांना कायमस्‍वरुपी रोजगार मिळावा यासाठी दूकानाचे संकुल बांधण्‍यात येणार आहे. सुमारे 20 लक्ष रुपये खर्चून बांधण्‍यात यावयाच्‍या  संकुलाचे भूमिपूजन यावेळी करण्‍यात आले.
युवकांना रोजगाराच्‍या संधी बरोबर कौशल्‍य विकास, शेतक-यांसाठी राष्‍ट्रीय पीक विमा योजना, शेतक-यासाठी सौर उर्जा कृषी पंप, महिला व युवकांसाठीच्‍या विविध योजना पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी सुरु केल्‍या आहेत. या योजनांचा लाभ घेण्‍याचे आवाहन यावेळी खासदार रामदास तडस यांनी केले.
                                         0000
      












            


No comments:

Post a Comment