Wednesday 1 June 2016

शेततळ्याची कामे तत्‍काळ सुरु
करण्याचे आवाहन
वर्धा, दिनांक २३ :  मागेल त्‍याला शेततळे योजनेंतर्गत कृषी विभागाकडे जिल्ह्यातील  2 हजार 75 ऑनलाईन अर्ज प्राप्‍त झाले असून लाभार्थी शेतक-यांना कार्यारंभ आदेश देण्‍यात आलेला आहे. तसेच प्रत्‍यक्ष कामास सुरवात सुद्धा झालेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्‍यांनी शेततळ्यांचे काम स्‍वतः मजुराव्‍दारे अथवा पर्यायी साधनाने (जेसीबी,पोकलॅन इ.) माध्‍यमातून पूर्ण करावे, असे आवाहन जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.ए. भारती यांनी केले आहे.
शेततळ्यांची कामे पूर्ण झाल्‍यावर कृषी विभागाच्या संबंधित कार्यालयास कळविल्‍यानंतर देय अनुदान शेतक-यांच्‍या बँक खात्‍यात तत्‍काळ थेट जमा करण्‍यात येणार आहे. सदर योजनेकरिता वर्धा जिल्‍हयास रु 590 लाख एवढा निधी उपलब्‍ध झालेला असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. सदर योजनेत ऑनलाईन अर्ज केलेल्‍या शेतक-यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा नजिकचे क्षेत्रीय कर्मचारी यांचेशी संपर्क साधून कामे सुरु करुन पावसाळा सुरु होण्‍याआधी कामे पूर्ण करावीत, असेही भारती यांनी सांगितले आहे.
                                                             00000

        आरटीई अंतर्गत 25 टक्‍के
      प्रवेश सोडत प्रक्रिया गुरुवारी
वर्धा, दिनांक २३ : आरटीई अंतर्गत 25 टक्‍के प्रवेशाकरिता ऑनलाईन सोडत दि.26 मे रोजी सकाळी 11 वाजता जिल्‍हा परिषद, वर्धा येथील सभागृहामध्‍ये काढण्‍यात येणार आहे. या सोडतीला जास्‍तीत जास्‍त पालकांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी केले आहे. े रोजी सकाळी 11 वाजता जिल्‍हा पिल्‍हा रिता ारे
बालकांचा मोफत व सक्‍तीचा शिक्षणाचा अधिकार 2009 नुसार सन 2016-17 या शैक्षणिक वर्षामध्‍ये 25 टक्‍के प्रवेशाची कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने राबविण्‍यात येत आहे. वर्धा जिल्‍ह्यामध्‍ये एकूण 120 शाळांमध्‍ये नर्सरीकरीता 487 व वर्ग पहिली करीता 172 असे एकूण 1 हजार 559 जागांकरीता ऑनलाईन प्रक्रियेव्‍दारे पालकांकडून 1 हजार 674 अर्ज प्राप्‍त झालेले आहे.  यामध्‍ये वर्धा तालुका 534, सेलू 114, देवळी 185, हिंगणघाट 394, समुद्रपूर 21, आर्वी 224, आष्‍टी 90 व कारंजा112 अर्जांचा समावेश असे शिक्षण विभागाव्‍दारे कळविण्‍यात आले आहे.
                                                00000

               मंडळस्‍तरावर शुक्रवारी पीक कर्ज मेळाव्‍याचे आयोजन  
वर्धा, दिनांक २० :  वर्धा तालुक्‍यातील शेतक-यांसाठी शुक्रवार, दि.27 मे रोजी सकाळी 11  तालुक्‍यातील मंडळस्‍तरावर  पीक कर्ज वाटप मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे. या मेळाव्‍यात जास्‍तीत जास्‍त शेतक-यांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन तहसीलदार राहुल सारंग यांनी केले आहे.
जिल्‍हाधिकारी यांचे निर्देशानुसार खरीप हंगाम 2016 -17 या वर्षाकरिता शेतक-यांना सुलभरित्‍या शेतीसाठी आवश्‍यक असणा-या पीक कर्ज शेतक-यांना वाटप करण्‍यासाठी पीक मेळावा आयोजित करण्‍यात आले आहेत. त्‍यामध्‍ये वर्धा तालुक्‍यातील महसूल मंडळांतर्गत वर्धाचे तहसील कार्यालय, वायफळ मंडळात वायफडचे यशवंत विद्यालय, तळेगाव मंडळात तळेगाव टालाटुले ग्रामपंचायत, सेवाग्राम मंडळांतर्गत  ग्रामपंचायत सेवाग्राम, सालोड हिरापूर मंडळांतर्गत सालोड (हि.) ग्रामपंचायत व आंजी मोठी मंडळांतर्गतआंजी येथील जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळेत  पीक कर्ज मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे. या  पीक कर्ज मेळाव्‍यात पीक कर्जाची उपलब्‍धता व मागील वर्षाच्‍या पीक कर्जाचे पुनर्गठन केले जाणार असल्‍याचेही तहसीलदार राहुल सारंग यांनी सांगितले आहे.
                                                0000


No comments:

Post a Comment