Wednesday 1 June 2016

पुलगाव दारुगोळा स्फोटातील मृत्‍यु पावलेल्‍या
कुटुंबियांना 5 लाख, तर जखमींना 1 लाखाची मदत
    वर्धा,दि.31- पुलगाव येथील दारुगोळा भांडाराला भीषण आग लागुन झालेल्‍या स्‍फेाटात मृत्‍यु पावलेल्‍या व्‍यक्तींच्‍या कूटुंबियांना 5 लाख रुपये तर जखमींना 1 लाख रुपये मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतुन तात्‍काळ देण्‍याचे निर्देश मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणास दिली असल्‍याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे दिली.
            या स्‍फोटाच्‍या पार्श्‍वभुमीवर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक आरोग्‍य मंत्री डॉ. दिपक सावंत, वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी रूग्णालयामध्‍ये जाऊन जखमींची विचारपूस केली.
          या घटनेची माहिती आपण मुख्‍यमंत्र्यांना दिली. मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतुन मृत व्‍यक्तींच्‍या कुटुंबियाना 5 लाख रुपये तर जखमींना 1 लाख रुपये तातडीची मदत देण्‍यात येईल, असे मुख्‍यमंतत्र्यांनी सां‍गितले. त्‍यानुसार कार्यवाही करण्‍याचे आदेश प्रशासनाला दिले असल्‍याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
            तात्‍काळ पंचनामे करून रक्‍कम तातडीने मृतांच्‍या कुटुंबियांना तसेच जखमींना देण्‍याचे निर्देशही यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिले.
०००००००००
प्र.प.क्र. 373
                                                                                
स्फोटामुळे क्षतिग्रस्त झालेल्या
आगरगावला पालकमंत्र्यांसह चार मंत्र्यांची भेट
       वर्धा, दि. ३१- पुलगाव येथील दारूगोळा भांडाराला भिषण आग लागून मोठा स्फोट झाला. त्यामुळे जिवीत व वित्तहानी झाली. या स्फोटामुळे आगरगावचेही नुकसान झाले.
वर्धा येथे जखमींची विचारपूस केल्यानंतर पुलगाव येथील स्फोटामुळे नुकसान झालेल्या आगरगाव या गावाला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह आरोग्य मंत्री डॅा.दिपक सावंत, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री विनोद तावडे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी भेट देऊन पाहणी केली. ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला.      
            पुलगाव येथील स्फोटामुळे लगतच्या पाच गावातील घरांची पडझड झाली आहे. स्फोटामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून पंधरा दिवसात भरपाई देण्याचे निर्देश पालकमंत्री श्री.मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मोठ्या प्रमाणावर झालेल्या स्फोटातील आवाजामुळे अनेकांच्या कानाला त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे पाचही गावात विशेष शिबिर घेऊन तपासणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ज्या व्यक्तींना कानाची दुखापत झाली असल्याचे आढळून येथील त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याच्या सुचनाही त्यांनी आरोग्य विभागास केल्या. यावेळी त्यांनी गावकऱ्यांकडून स्फोट व त्यानंतरची माहिती जाणून घेतली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.   
००००००००००००



No comments:

Post a Comment