Friday 3 June 2016

विभागीय आयुक्‍त अनुपकुमार यांची
पिंपरी, आगरगावला भेट
Ø ग्रामस्‍थांशी चर्चा
Ø 446 घराचे नुकसान
Ø आरोग्‍य कॅम्‍प सुरु

        वर्धा,दि.1-नुकत्‍याच पुलगाव येथील घटनेच्‍या पार्श्‍वभूमीवर पिंपरी  आणि  आगरगावला आज विभागीय आयुक्‍त अनुप कुमार यांनी भेट देऊन ग्रामस्‍थासोबत चर्चा केली. स्‍फोटामुळे घरांचे नुकसान झाले आहे. आवाजामुळे ग्रामस्‍थांना त्रास होऊ नये यासाठी आरोग्‍य तपासणी करण्‍यसाठी विशेष वैद्यकिय कॅम्‍प सुरु करण्‍याच्‍या सुचना दिल्‍यात. 446 घरांना तडे गेले असून मदतीबाबत तात्‍काळ कार्यवाही  करण्‍याच्‍या सुचनाविभागीय आयुक्‍तांनी  दिल्‍या. यावेळी जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल, जिल्‍हा परिषेदेचे उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी श्री.इलमे, गटविकास अधिकारी श्री. शिंदे, तहसिलदार श्रीमती तेजस्विनी जाधव, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी उपस्थित होते.
            आगरगाव 337 , पिंपरी 92 ,नागझरी 17 घरांच्‍या नुकसानीच्‍या संदर्भाबाबत बांधकाम विभाग, महसूल विभाग, ग्रामसेवक यांनी प्रत्‍यक्ष नुकसानीचे सर्वेक्षण  करुन अहवाल सादर करण्‍याच्‍या सुचना यावेळी. विभागीय आयुक्‍त यांनी  दिल्‍या.

                                                            0000

No comments:

Post a Comment