Friday 3 June 2016

केंद्रीय पथकाने केली दुष्‍काळ भागाची पहाणी
जाम गावातील शेतक-यांनी मांडल्‍या आपल्‍या कैफियती
        वर्धा,दि.1-सन 2015 मधील खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी झाल्‍यामुळे शेतक-याचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले असून अशा शेतक-यांना केंद्रशासनामाफर्त मदत मिळावी यासाठी वर्धा जिल्‍ह्यातील शेतक-यांशी  चर्चा करण्‍यासाठी  आलो आहेत. असे केंद्रशासनाच्‍या निती आयोगाचे अधिकारी डॉ. रामानंद यांनी समुद्रपूर तालुक्‍यातील जाम येथे शेतक-यांशी चर्चा करतांना सांगितले.
            वर्धा जिल्‍ह्यातील समुद्रपूर तालुक्‍यातील जाम येथील ग्रामपंचायतीच्‍या सभागृहात आज  केंद्र शासनाच्‍या दुष्‍काळ पाहणी पथकातील सदस्‍य निती आयोगाचे अधिकारी डॉ. रामानंद केंद्र शासनाच्‍या ग्रामविकास  विभागाचे अवर सचिव रामा वर्मा, केंद्र शासनाच्‍या जलसंसाधन विभागाचे उपसंचालक मिलींद  पानपाटील, अे.जी.एम.एफ. सी.आय.मुंबईचे एम.एम.बोराडे,डायरेक्‍टर सेट्रल इलेक्‍ट्रीसिटी चे जे.के. राठोड यांनी आज जाम गावातील शेतक-यांशी चर्चा करुन त्‍यांच्‍या समस्‍या जाणून घेतल्‍या यावेळी शेतक-यांना त्‍यांनी गावात पिण्‍याचे पाणी आहे का ? मागच्‍या वर्षी किती टक्‍के उत्‍पादन झाले, पीक पेरणी व इतर खर्च किती झाला व उत्‍पादन किती मिळाले तसेच आणेवारी 50 टक्केच्‍या आत आहे का  याबाबत सविस्‍तर चर्चा केली.
यावेळी निती आयोगाचे अधिकारी डॉ. रामानंद यांनी जाम येथील शेतकरी अमोल जांभळीकर यांच्‍याकडून  मागच्‍या वर्षी झालेल्‍या उत्‍पादनाबाबतची  मा‍हिती जाणून घेतली.  यावेळी जांभळीकर यांनी सांगितले की, माझ्याकडे दहा एकर शेती असून सन 2015 मध्‍ये खरीप  हंगामात मी कापूस व सोयाबिन व तूरीचा पेरा केला होता. त्‍यासाठी  पाच लाख रुपये खर्च केले परंतु उत्‍पन्‍न दोन लाखही आलेले नाही. त्‍यामुळे शेतकरी खूप अडचणीत आहे. अशीच बोलकी प्रतिक्रीया अवधूत सोमल, अजय  पिटे या शेतक-यांनी व्‍यक्‍त केली. यावेळी पथकातील पाचही सदस्‍यांनी जांम गावातील शेतक-यांच्‍या समस्‍या  समजून घेत केंद्र शासनाच्‍या कृषी विभागांच्‍या योजनांचा आपल्‍याला लाभ मिळाला आहे की, मिळाला नसेल तर आपण मिळवून देण्यासाठी प्रयत्‍न करु असेही त्‍यांनी यावेळी सांगितले
            यावेळी काही शेतक-यांनी कैफियत मांडतांना  सांगितले की, खरीपाचा हंगाम गेल्‍यावर रब्‍बी हंगाम चांगला होईल या आशेवर शेतक-यांनी रब्‍बीसाठी खर्च केले परंतु तोंडाशी घास आला असतांना अचानक गारपीट आल्‍यामुळे शेतक-यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. यापुढे  या जिल्‍हयातील  शेतकरी हवालदील झालेला असून  त्‍याला शासकीय मदतीची मोठ्या प्रमाणात गरज आहे.असेही शेतक-यांनी  पथकाकडे मागणी केली.
            काही शेतक-यांनी जलयुक्‍त शिवारांची  कामे या परिसरात सुरु करण्‍यात  यावेत,पिकांचे  निल गाई मोठया प्रमाणात नुकसान करतात त्‍यांचा  बंदोबस्‍त करावा अशी मागणीही  त्‍यांनी पथकाकडे केली.
            या पथकासोबत अप्‍पर जिल्‍हाधिकारी  दीपक नलवडे,समुद्रपूरचे तहसिलदार सचिन यादव, हिंगणघाटचे तहसिलदार दीपक कारंडे, कृषी सहसंचालक विजय घावडे , जिल्‍हा कृषी अधिकारी डॉ. भारती इत्‍यादी उपस्थित होते.  

                                                                        0000

No comments:

Post a Comment