Tuesday 6 November 2012

पत्रव्‍दारा डी.टी.एड. प्रशिक्षण


      वर्धा, दि. 5-बालकांना मोफत व सक्‍तीच्‍या  शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत महाराष्‍ट्र राज्‍यातील जिल्‍हा परिषद, नगरपालीका, नगरपरिषद, महानगरपालीका, कटक मंडळाच्‍या प्राथमिक शाळा आणि सर्व व्‍यवस्‍थापनाच्‍या सर्व माध्‍यमाच्‍या  शासनमान्‍यता प्राप्‍त  खाजगी प्राथमिक व माध्‍यमिक अनुदानित, विनाअनुदानीत, कायम विना अनुदानित शाळा तसेच आदिवासी विकास व समाजकल्‍याण विभागाच्‍या प्राथमिक व माध्‍यमिक शाळा व शासकीय मान्‍यताप्राप्‍त   खाजगी आश्रमशाळेतील पात्र अप्रशिक्षित प्राथमिक, माध्‍यमिक शिक्षण, शिक्षण सेवक, निमशिक्षक अपंक एका‍त्‍मीक शिक्षण योजने तील शिक्षण यांच्‍यासाठी  सन 2012-2013 साठी शासन निर्णयानुसार पत्रव्‍दारा डि.टी.एड.प्रशिक्षण योजनेची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्‍यात येत आहे.
      पत्रव्‍दारा डि.टी.एड. प्रशिक्षण प्रवेशाचे आवेदनपत्र व माहिती पुस्तिका शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिलहा परिशद यांचेकडे दिनांक 17 नोव्‍हेंबर 2012 पर्यंत कार्यालयीन  वेळेत शासकीय सुटीचे दिवस सोडून रुपये 200 (रुपये दोनशे फक्‍त) शुल्‍कासह  उपलब्‍ध  होतील. मुंबई व उपनगरातील अप्रशिक्षित प्राथमिक शिक्ष , शिक्षण सेवकासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बृहन्‍मुंबई हिंदु कॉलनी, दादर यांचेकडे उपलबध होतील. संबंधित अप्रशिक्षित शिक्षक, शिक्षण सेवकांनी पूर्ण भरलेली आवेदनपत्रे दिनांक 19 नोव्‍हेंबर 2012 पर्यंत आपल्‍या विद्यालयाच्‍या मुख्‍याध्‍यापकामार्फत माहिती पुस्तिकेत नमुद केल्‍याप्रमाणे ज्‍या ठिकाणाहुन आवेदनपत्र घेतली त्‍याच ठिकाणी सादर करावीत. उशिरा अगर पोष्‍टाने व कुरिअरने आलेली आवेदनपत्रे स्विकारली जाणार नाहीत. पात्र अप्रशिक्षित शिक्षकांनी 31 मार्च 2015 पुर्वी प्रशिक्षित होणे बंधनकारक असल्‍याने ही अंतिम प्रवेश प्रक्रिया राहणार आहे. याची सेवेत असलेल्‍या आणि सक्षम प्राधिका-याची मान्‍यता असलेल्‍या सर्व व्‍यवस्‍थापनाच्‍या व माध्‍यमाच्‍या पात्र अप्रशिक्षित प्राथमिक व माध्‍यमिक शिक्षकांनी नोंद घ्‍यावी. असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्‍हा परिषद, वर्धा कळवितात.
                           00000

No comments:

Post a Comment