Tuesday 6 November 2012

डेंग्‍यू,मलेरीया साथरोग नियंत्रणासाठी परिसर स्‍वच्‍छ ठेवा जनतेला सहकार्याचे आवाहन - ज्ञानेश्‍वर ढगे


        वर्धा, दि.5 – डेंग्‍यू, मलेरीया आदि साथीच्‍या आजारावर नियंत्रणासाठी जिल्‍ह्यातील  सर्व ग्रामपंचायत व नगरपरिषदांनी परिसर स्‍वच्‍छतेवर  विशेष भर देऊन कुठेही डासाची  उत्‍पत्‍ती  होणार नाही याची  खबरदारी घ्‍यावी  तसेच जनतेनेही पाण्‍याच्‍या  साठवणूक  न करता घराचा परिसर स्‍वच्‍छ ठेवण्‍यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे यांनी आज केले आहे. 
     साथीच्‍या आजारावर नियंत्रणासाठी तसेच हा आजार होऊच नये यासाठी  ग्रामीण जनतेनी  वैयक्तिक पातळीवर प्रतिबंधात्‍मक उपाययोजना सुरु करणे आवश्‍यक असून , प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करताना ज्ञानेश्‍वर ढगे म्‍हणाले की, घर व घराच्‍या परिसरात पाणी साचने असल्‍यास त्‍यामध्‍ये डास, अळ्या आढळून आल्‍यास  असे पाणीसाठे नष्‍ट करावे, आठवड्यातील किमान कोरडा दिवस म्‍हणून पाळावा, निरुपयोगी वस्‍तू , फुटके माठ, फाटके टायर, कुंडया यामध्‍ये  पाण्‍याची साठवणूकीमुळे  डासांची उत्‍पत्‍ती  होते. असे साहित्‍य नष्‍ट करावे. घरातील कुलरमधे पाणी गोळा  होणार नाही अशा ठिकाणी व्‍यवस्‍थीत ठेवावे.
     घरातील अथवा गावातील कुटूंबात कोणत्‍याही व्‍यक्‍तीस ताप आल्‍यास  त्‍याला तात्‍काळ  शासकीय रुग्‍णालयामध्‍ये  उपचारासाठी पाठवावे. तसेच तालुका अथवा प्राथमिक आरोग्‍य  केन्‍द्रास यासंबधीची माहिती द्यावी. असे आवाहन करताना जिल्‍ह्यातील  सर्व आरोग्‍य   केन्‍द्र व उपकेंद्रांमध्‍ये साथीच्‍या रोगासाठी  तात्‍काळ  औषधोपचार करण्‍यासाठी  वैद्यकीय चमू  ठेवण्‍यात आली आहे.
     ग्रामीण भागामध्‍ये   अस्‍वच्‍छ  वातावरणामुळे  व सांडपाण्‍याच्‍या नाल्‍यांमध्‍ये  पाणी  साचल्‍यामुळे  डासांची  उत्‍पत्‍ती  होऊ शकते व त्‍यामुळे  डेंग्‍यू , मलेरीया आदी  साथीच्‍या  रोगाची लागन काही भागात आढळून आल्‍यामुळे  ग्रामपंचायतींनी  विशेष दक्षता घ्‍यावी,  अशा सुचना करताना ज्ञानेश्‍वर ढगे म्‍हणाले की जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, जिल्‍हा शल्‍य  चिकित्‍सक  यांच्‍या  प्रमुख उपस्थितीत विशेष मोहीम जिल्‍ह्यात सुरु असून, जनतेनी  वैयक्तिक पातळीवरही खबरदारी घ्‍यावी. असे आवाहनही  जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष  ज्ञानेश्‍वर ढगे यांनी आवाहन केले आहे.
                         0000000

No comments:

Post a Comment