Tuesday 6 November 2012

डेंग्‍यू नियंत्रण व प्रतिबंधात्‍मक उपाययोजना सुरु डेंग्‍यू आजारामुळे 24 रुग्‍ण बाधीत


वर्धा,दिनांक 5 – डेंग्‍यूसह साथीच्‍या आजारावर नियंत्रण व प्रतिबंधात्‍मक उपाययोजना लागन झालेल्‍या  गावात प्रभावीपणे  सुरु करण्‍यात आल्‍या  असून, खाजगी रुग्‍णालयात उपचार घेत असलेलया रुग्‍णांची माहिती तसेच रक्‍तजल नमुन्‍यांची तपासणी सुरु करण्‍यात आली  असल्‍याची  माहिती जिल्‍हा परिषदेचे  मुख्‍य कार्यपालन अधिकारी श्री. शेखर चन्‍ने यांनी आज दिली.
     साथीच्‍या आजारासोबत डेंग्‍यूमुळे आजारी पडलेल्‍या  रुग्‍णांना तात्‍काळ  औषधोपचार मिळावा यासाठी  तालुका व जिल्‍हास्‍तरावर आरोग्‍य विभागातर्फे विशेष कक्ष  सुरु करण्‍यात आला आहे.
      मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने  यांनी  आज सेलू  तालुक्‍यातील  सिंदी रेल्‍वे तसेच सलाईकला येथील  प्राथमिक आरोग्‍य  केन्‍द्रांना  भेट देऊन साथीच्‍या आजाराबाबत सुरु असलेल्‍या  उपाययोजना व औषधोपचाराबाबत जिल्‍हा आरोग्‍य  अधिकारी डॉ. माने यांचेकडून संपूर्ण माहिती घेतली. तसेच  ग्रामस्‍थांशी  थेट  संवाद साधून  डेंग्‍यू आजाराबाबत  करावयाच्‍या  उपाययोजना व ग्रामस्‍वच्‍छता, पिण्‍याचे पाणी, गावातील गटारांची स्‍वच्‍छता  करण्‍यासाठी  ग्रामस्‍थांनी  पुढाकार घेवून  आपले गाव स्‍वच्‍छ ठेवण्‍याचे  आवाहन यावेळी केले.
     संशयीत  डेंग्‍यू  आजाराकरीता  जिल्‍ह्यात  139 लोकांचे रक्‍तजल नमुने  देण्‍यात आले असून, त्‍यापैकी  24 रुग्‍ण  डेंग्‍यू  दुषीत आढळले आहेत. यामध्‍ये वर्धा जिल्‍ह्यातील 6, सेलू 1 , देवळी 1, कारंजा 3, आर्वी 2 ,हिंगणघाट 9, समुद्रपूर 2 अशा 24 रुगणांचा  समावेश आहे.
      डेंग्‍यूचे  अथवा किटकजन्‍य आजाराचे रुग्‍ण  आढळलेल्‍या  गावामध्‍ये  आरोग्‍य  विभागाअंतर्गत गृहभेटीव्‍दारे संरक्षण करण्‍यात येत असून, या भेटीमध्‍ये  रुग्‍णांचे  रक्‍ताचे नमूने घेणे व ते पुणे येथे तपासणीसाठी पाठवित असतानाच किटकसंमाहरकाव्‍दारे डास संकलन करुन  डासघनता काढणे यावर विशेष भर असल्‍याचे  सांगताना  मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने म्‍हणाले की, डासाची उत्‍पत्‍ती होणार नाही यासाठी  गप्‍पीमाशांचा उपयोग तसेच शिघ्र ताप पथकाव्‍दारे भेट देऊन त्‍वरीत उपचार व निदान करण्‍यावर या मोहिमे अंतर्गत विशेष भर देण्‍यात आल्‍यामुळे  जिल्‍ह्यात  साथीच्‍या आजारावर  तात्‍काळ नियंत्रण शक्‍य झाले आहे.
       डासांची  उत्‍पत्‍ती होणार  नाही यासाठी ग्रामस्‍तरावर  प्रभावी उपाययोजना आवश्‍यक असून, ग्रामस्‍थांच्‍या सहभागाने शेणाचे खड्डे गावाबाहेर हलविणे, उकीरड्यावर लिंडेन पावडरची डस्‍टींग करणे, प्रत्‍येक घरात फ्रॉगींग करणे व जनतेला आरोग्‍य  शिक्षणाव्‍दारे आठवड्यातून  एक दिवस कोरडा दिवस पाळण्‍याच्‍या सुचनाही  देण्‍यात आल्‍या आहेत.
     डेंग्‍यू नियंत्रण व प्रतिबंधात्‍मक उपाययोजने अंतर्गत  शहरी भागामध्‍ये  झोपड्यावर टाकण्‍यात येणा-या  प्‍लॅस्‍टीकवर पाणी  साठवून  डास होण्‍याची जास्‍त  शक्‍यता  असल्‍यामुळे  प्रत्‍येकांनी घराच्‍या प्‍लॅसटींकवरुन तात्‍काळ काढून टाकावे. असे आवाहन  करताना मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने  यांनी उघड्यावर संडास केल्‍यामुळे  तसेच अस्‍वच्‍छतेमुळे  साथीचे रोग होणार नाही याची काळजी प्रत्‍येक  ग्रामपंचायत स्‍तरावर घेण्‍यात येत असल्‍याचे  त्‍यांनी सांगितले.
     ज्‍या गावांमध्‍ये  मागील वर्षी  साथीची लागन झाली होती अशा गावांमध्‍ये नियमितपणे सर्वेक्षण तसेच किटक संमाहरकामार्फत कंटेनर सवर्हेक्षण  करण्‍यात येणार आहे. आरोग्‍य कर्मचा-यामार्फत नियमितपणे 10 टक्‍के  घरांचे  कंटेनर सर्व्‍हेक्षण  करण्‍यात येऊन रुग्‍ण आढळून आल्‍यास पॅरामिटर्स प्रमाणे कारवाही करण्‍यावर  भर देण्‍यात आला आहे.
     किटकजन्‍य  ताप उद्रेक नियंत्रणासाठी  जिल्‍हा प्रशासनातर्फे संपूर्ण प्रतिबंधात्‍मक उपाययोजना, करण्‍यात आल्‍या असून, ग्रामस्‍वचछता व परिसर स्‍वचछतेसाठी सर्व जनतेनी सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने यांनी केले आहे.
                           000000

No comments:

Post a Comment