Tuesday 6 November 2012

ग्रामविकासाला सर्वोच्‍च प्राधान्‍य देणारे आदर्श ग्रामसेवक


   
वर्धा,दिनांक 6 – गावांच्‍या  सर्वांगीन विकासासोबत निर्मल व हागणदारीमुक्‍त  गाव करण्‍याचे  नियोजन करणा-या  व त्‍याची  प्रभावी अंमलबजावनी करुन  लोकसहभागाने  आपले गाव सातत्‍याने  आदर्श ठेवणा-या 16 ग्रामसेवकांचा गौरव  आज जिल्‍हा परिषदेतर्फे करण्‍यात आला.
     ग्रामसेवकांनी  आपल्‍या  कार्यक्षेत्रातील गावात वैशिष्‍यपूर्ण  उपक्रमाची आखणी करुन लोकसहभागातून   अंमलबजावनी करणा-या  ग्रामसेवकांच्‍या कार्याची  दखल घेऊन  तयांचा आदर्श इतर गावांनीही गिरवावा असा उपक्रम जिल्‍हा परिषदेच्‍या ग्रामपंचायत विभागाने सुरु केला असून, आदर्श ग्रामसेवक पुरस्‍कार देऊन  त्‍यांच्‍या कार्याची  दखल घेतली आहे.
     जिल्‍हा परिषदेच्‍या सभागृहात अध्‍यक्ष  ज्ञानेश्‍वर ढगे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने   यांनी    16 आदेर्श ग्रामसेवकांना शाल श्रीफळ पुष्‍पगुच्‍छ   व प्रमाणपत्र देऊन   गौरविले. त्‍यावेळी ग्रामसेवकांनीही  आपण केलेल्‍या   कामाची   नोंद   प्रशासनाने    घेतली याचे समाधान  पुरस्‍कार स्विकारताना  जाणवत होते.   
     यावेळी  मार्गदर्शन करताना जिल्‍हा  परिषद अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे म्‍हणाले की, विविध योजनांच्‍या  अंमलबजावणीसाठी  ग्रामसेवक हा महत्‍वाचा घटक असून, शेतकरी व सामान्‍य  जनतेपर्यंत  शासनाच्‍या  विविध योजना  पोहचवतो आणि जनतेलाही  या योजनांचा  लाभ देण्‍यासाठी  प्रोत्‍साहीत करतो . त्‍यामुळे ग्रामसेवक हा ग्रामीण भागाच्‍या  विकासाचा  महत्‍वाचा कणा आहे.  
       मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने  यांनी   विविध विकास योजनांच्‍या अंमलबजावनीमध्‍ये विभागात वर्धा जिल्‍हा आघाडीवर असून महात्‍मा गांधी नरेगा योजनेच्‍या अंमलबजावनीसाठी  ग्रामसेवकांनी पुढाकार घेतल्‍यामुळेच वर्धा जिल्‍ह्याची  पंतप्रधान पुरस्‍कारासाठी शिफारस  झाली आहे. ग्रामसेवकांनी आपल्‍या  कार्यक्षेत्रातील  गावांचा विकास आराखडा तयार करुन  त्‍यानुसार  प्रत्‍यक्ष  अंमलबजावनीला सुरुवात करावीत अशी सुचना केली.  
     यावेळी  शिक्षण व आरोग्‍य  समितीच्‍या सभापती श्रीमती उषाताई थुटे, महिला व बालकल्‍याण समितीच्‍या सभापती श्रीमती निर्मलाताई बिजवे, समाजकल्‍याण सभापती नंदकिशोर कंगाले यांचेही  मार्गदर्शनपर भाषणे झाली.
     प्रास्‍ताविक स्‍वागत उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी केले. यावेळी  आदर्श ग्रामसेवक पुरस्‍कार मिळालेल्‍या  ग्रामसेवकांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
                           000000

No comments:

Post a Comment