Tuesday 6 November 2012

सार्वजनिक ग्रंथालयासाठी पुरस्‍कार योजना


     वर्धा,दि.6 - महाराष्‍ट्र शासनाच्‍या उच्‍च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्‍यातील शासनमान्‍यताप्राप्‍त  सार्वजनिक ग्रंथालयाच्‍या गुणात्‍मक विकास व्‍हावा, त्‍यांचया कउून अधिक चांगल्‍या सेवा दिल्‍या जाव्‍यात  यासाठी  प्रोत्‍साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी उत्‍कृष्‍ट ग्रंथालये व ग्रंथालय चळवळीतील उत्‍कृष्‍ट कार्यकर्ते व सार्वजनिक ग्रंथालयामधील कर्मचारी यांना शासनातर्फे पुरस्‍कार  देऊन गौरविण्‍यता येते.
      या योजनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्‍कार  यांचे नावाने शासनमान्‍य सार्वजनिक ग्रंथालयांच्‍या शहरी व ग्रामीण पातळीवरील अ,ब,क,ड वर्गातील प्रत्‍येकी एक अशा एकूण 8 पुरस्‍कारासाठी  ग्रंथालयांकडून प्राप्‍त  प्रस्‍तावांतून निवड समितीकडून निवड करण्‍यात येते. तसेच डॉ. एस.आर.रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्‍कार यांचे नावाने ग्रंथालय चळवळीच्‍या  विकासासाठी  कार्य करणा-या कार्यकर्त्‍यांना  व सेवाभावी  वृततीने काम करणा-या उत्‍कृष्‍ट कर्मचा-यांना प्रोत्‍साहन मिळावे या उद्देशाने राज्‍यस्‍तरावर प्रत्‍येकी  एकेक व महसूली विभागातून प्रत्‍येकी एक याप्रमाणे  एकूण 14 पुरस्‍कारासाठी त्‍यासाठीच्‍या  निवड समितीकडून निवड करण्‍यात येते.
      2012-13 या वर्षासाठी  या पुरस्‍कार योजनेमध्‍ये सहभागी होऊ इच्छिणा-या शासनमान्‍य  सार्वजनिक ग्रंथालयांनी तसेच ग्रंथालय चळवळीत ज्‍या कार्यकर्त्‍यांनी  व कर्मचा-यांनी किमान 15 वर्ष ग्रंथालयीन क्षेत्राच्‍या विकासासाठी कार्य केलेले आहे अशा पात्र ठरणा-या इच्‍छूक ग्रंथालय, कार्यकर्ते, कर्मचारी यांनी आपल्‍या विभागाच्‍या  सहाययक ग्रंथालय संचालक कार्यालयाकडे  30 नोव्‍हेंबर 2012 पूर्वी सादर करावेत. विद्यमान वर्षापासून  अर्ज करणा-या संस्‍था, व्‍यक्‍ती यांना प्रत्‍यक्ष भेटी देऊन प्राथमिक तपासणीनंतरच प्रस्‍ताव  अंतिमतः निवड समितीकडे सादर करण्‍यात येणार आहेत. याबाबत प्रस्‍ताव पाठविण्‍याची मुदतीत कार्यवाही  करावी. असे आवाहन दि. श्री. च्‍व्‍हाण, संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्‍ट्र राज्‍य  यांनी केले आहे.
                              00000 

No comments:

Post a Comment