Saturday 3 November 2012

सर्वांगीन विकासाला चालना देणा-या योजनांचा समावेश जिल्‍हा वार्षिक योजनेत करा - एन.नविन सोना


                              

   *  पुढील वर्षासाठीच्‍या वार्षिक योजनेचा आराखडा तयार
   * बैठकींना अनुपस्थित अधिका-यांविरुध्‍द कडक कारवाई
   * विभाग प्रमुखांकडून 120 कोटी 13 लक्ष रुपयाचे प्रस्‍ताव सादर
   * लघु गटातर्फे जिल्‍हा वार्षिक योजनेला मान्‍यता  

          वर्धा, दि. 3- जिल्‍ह्याच्‍या  सर्वांगीन विकासाला सहाय्यभुत ठरणा-या  तसेच वैयक्तिक लाभाच्‍या  योजनांसाठी  आवश्‍यक असलेल्‍या निधी मागणीचे प्रस्‍ताव विभाग प्रमुखांनी  तात्‍काळ  जिल्‍हा वार्षिक योजनेमध्‍ये  समावेश करण्‍यासाठी  सादर करावेत. अशा सूचना जिल्‍हाधिकारी एन. नविन सोना यांनी आज दिल्‍यात.
          जिल्‍हा वार्षिक योजनेसारख्‍या  महत्‍वाच्‍या  बैठकांना अनुपस्थित असलेल्‍या  अधिका-यांबद्दल  तीव्र  नाराजी व्‍यक्‍त करुन अशा अधिका-यांबाबतची माहिती  संबधीत विभागप्रमुख व सचिवांना  कळविण्‍याच्‍या  सुचनाही  जिल्‍हाधिकारी यांनी सुचना केली.
          जिल्‍हाधिकारी  कार्यालयातील सभागृहात जिल्‍हा वार्षिक योजना 2013-14 साठी सर्व साधारण प्रारुप आराखड्याची  लघुगटाव्‍दारे  छाननी करण्‍यासाठीची बैठक  एन. नविन सोना यांच्‍या अध्‍यक्षतेखाली  तसेच लघु गटाचे प्रमुख आमदार सुरेश देशमुख यांच्‍या प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्‍यात आली होती.
          यावेळी  जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यपालन अधिकारी  शेखर चन्‍ने, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्‍प संचालक गिरीश सरोदे, जिल्‍हा  नियोजन अधिकारी प्रकाश डायरे तसेच  सर्व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.
          जिल्‍हा वार्षिक योजनेमध्‍ये  विभागप्रमुखांकडून  विविध विकासकामांबाबत प्रस्‍ताव  सादर करताना  लाभार्थ्‍यांना  होणारा वैयक्तिक लाभ तसेच जिल्‍ह्याच्‍या  सर्वांगीन विकासाला सहाय्यभूत ठरणारे उपक्रमांचा समावेश  करतानाच या योजनांच्‍या  अंमलबजावणी  बाबतही    सविस्‍तर  अहवाल  तयार करण्‍याच्‍या  सूचना करतानाच उपलब्‍ध  झालेला निधी  निर्धारीत कालावधीत  खर्च करण्‍याचे  नियोजनही  करावे, असेही  जिल्‍हाधिका-याने यावेळी  स्‍पष्‍ट  केले.
            120 कोटी  13 लक्ष रुपये खर्चाचे प्रस्‍ताव सादर
          जिल्‍हा वार्षिक योजनेमध्‍ये  सर्वसाधारण योजनांसाठी  शासनाने  79 कोटी 19 लक्ष रुपायाच्‍या  कमाल आर्थिक  मर्यादेत निश्चित केली असून, अंमलबजावनी अधिका-यांनी  120 कोटी  13 लक्ष 94 हजार रुपयाच्‍या नियोजनाचे  प्रस्‍ताव  सादर केले आहे. अंमलबजावनी अधिका-यांकडून प्राप्‍त   झालेल्‍या  प्रस्‍तावावर विभागनिहाय यावेळी  चर्चा करण्‍यात आली.  वार्षिक नियोजन आढावा बैठकीमध्‍ये जिल्‍ह्याचा   अंतीम आराखडा निश्चित होणार आहे.                                               
       प्रारुप वार्षिक योजनेमध्‍ये  कृषी व संलग्‍न सेवेसाठी  10 कोटी 29 लक्ष 82 हजार रुपये  कमाल नियतव्‍यय  मंजूर आहे. ग्रामविकास कार्यक्रमासाठी  14 कोटी रुपये,पाटबंधारे विकासासाठी  5 कोटी 17 लक्ष 33 हजार रुपये  तसेच वाहतूक व दळणवळणासाठी  16 कोटी  11 लक्ष 72 हजार रुपये  याप्रमाणे  विविध विभागांसाठी  कमाल मर्यादेत निधी  मंजूर करण्‍यात आला आहे.  तसेच  अंमलबजावनी अधिका-यांकडून प्रस्‍तावित निधी  बाबतही  राज्‍यस्‍तरीय बैठकीसमोर सादरीकरण करण्‍यात येणार असलयाची माहिती  जिल्‍हाधिकारी एन. नविन सोना यांनी दिली.
            अनुसूचित जाती उपाय योजने अंतर्गत सन 2013-14 साठी 28 कोटी  71 लक्ष रुपये कमाल आर्थिक मर्यादेत प्रस्‍ताव  मंजूर करण्‍यात आले आहे. अंमलबजावनी अधिका-यांकडून 31 कोटी 59 लक्ष 65 हजार रुपये  खर्चाचे प्रस्‍ताव  सादर केले आहेत. आदिवासी उपययोजने अंतर्गत 22 कोटी 23 लक्ष रुपये  आर्थिक मर्यादा निश्चित केली असून, विविध यंत्रणांकडून  36 कोटी रुपयाचे प्रस्‍ताव सादर झालेले आहे. अतिरीक्‍त मागणी बाबत राज्‍य समिती समोर प्रस्‍ताव  ठेवण्‍यात येणार आहे.
प्रारंभी  जिल्‍हा नियोजन अधिकारी  प्रकाश डायरे यांनी  स्‍वागत करुन  जिल्‍हा वार्षिक योजना  2013-14 साठीच्‍या  प्रारुप आराखड्याची  तसेच विविध विभागांकडून प्राप्‍त झालेल्‍या   अतिरीक्‍त प्रस्‍तावाची  माहिती दिली.  
आमदार सुरेश  देशमुख  यांनी  रस्‍ते, पाणी तसेच  कृ‍षी  विभागा संदर्भातील अपूर्ण  योजना प्राधान्‍याने  पूर्ण  करण्‍यावर  विशेष  भर विभागप्रमुखांनी द्यावा तसेच  नवीन कामांसाठी निधीची  मागणी करताना  वैयक्तिक लाभाच्‍या योजनांचा   प्राधान्‍याने  समावेश करावा, अशी सुचना केली.
 मुख्‍य कार्यपालन अधिकारी  शेखर चन्‍ने यांनी जिल्‍हा परिषदेमार्फत राबविण्‍यात येणा-या विविध योजनांची माहिती  दिली. ग्रामीण भागात पिण्‍याचे पाणी ,दळणवळण,शाळांची  विशेष दुरुस्‍ती  व आरोग्‍य सेवेसाठी  अतिरीक्‍त  निधी  मंजूर करण्‍याची सुचना यावेळी केली.
जिल्‍ह्यातील  सर्व कार्यालयांचे हायर ऑडीट तात्‍काळ पूर्ण करुन त्‍या संबधीचा अहवाल सादर करण्‍याच्‍या सुचना करताना जिल्‍हाधिकारी  एन.नविन सोना यांनी नगर परिषदांनी अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्‍यासाठी प्राधान्‍य देऊन महत्‍वाच्‍या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा सज्ज  राहील यादृष्‍टीने खबरदारी घेण्‍यात  यावी. असेही यावेळी त्‍यांनी सांगितले.
बैठकीत जिल्‍ह्यातील विविध अंमलबजावनी यंत्रणांचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
                                                     000000

No comments:

Post a Comment