Wednesday 31 October 2012

शेतक-याची फसवणूक टाळण्‍यासाठी शेती साहित्‍यांची किंमत निश्चित करणार - राधाकृष्‍ण विखे पाटील


        वर्धा दि.31- शेतीसाठी लागणा-या  साहित्‍याची किंमत निश्चित नसल्‍यामुळे शेतक-यांना अवास्‍तव किंमत देवून शेती हंगामासाठी साहित्‍य खरेदी करावे लागते यामध्‍ये शेतक-यांची फसवणूक होत असल्‍यामुळे शेतीसाठी लागणा-या सर्व साहित्‍यांची किंमत निश्चित करण्‍यात येणार असल्‍याची घोषणा कृषी व पणनमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली .
           बोरगांव मेघे येथील औषधशास्‍त्र महाविद्यालयाच्‍या प्रांगणात  दत्‍ता मेघे आयुर्विज्ञाण संस्‍थांन अभिमत विद्यापिठाच्‍या गुलगुरुपदी डॉ. दिलीप गोडे यांची नियुक्‍ती झाल्‍याबद्दल आयोजित अभिनंदन सोहळा तसेच कृषी विभागातर्फे ठिंबक तृषार योजनेतील लाभार्थ्‍यांना धनादेश व कृषी तारण योजनेच्‍या  भिंतीचित्राचे प्रकाशण राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या हस्‍ते झाले त्‍याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
         यावेळी आमदार विजय वडेट्टीवार, नागपूर सुधार प्रन्‍यासचे विश्‍वस्‍त अंनंतराव घरड, राधिकाबाई मेमोरीयल ट्रसचे कोषाध्‍यक्ष सागर मेघे, माजी आमदार डॉ.राजेंद्र गोडे, डॉ.शिरीष गोडे, प्रा. डॉ. भरत मेघे, कुलगुरु डॉ. दिलीप संतोषराव गोडे, डॉ.सौ. सुरिंदर गोडे, युथ वेल्‍फेअर सोसायटीचे अध्‍यक्ष संदिप मेघे, बबणराव तायवाडे, शेखर देशमुख आदि व्‍यासपिठावर उपस्थित होते.
          डॉ.दिलीप संतोषराव गोडे यांनी वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करुण मिळविलेले ज्ञानाचा  समाजातील अत्‍यंत गरीब व्‍यक्‍तींसाठी लाभ होणार असून सामाजिक जाणीव व शेतकरी व शेतमजूरांबद्दल त्‍यांची बांधिलकी असल्‍याचे सांगतांना कृषीमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील म्‍हणाले की, नवीन तंत्रज्ञाणाचा लाभ शेतक-यांना करुण देण्‍यासाठी प्रत्‍यक्ष शेतावर जाऊण प्रात्‍याक्षिक करण्‍याची आवश्‍यकता व्‍यक्‍त केली.
          शेतक-यांना शेती संदर्भात मार्गदर्शन करतांनाच शेतक-यांना बीयाणे, खत व शेतीसाहित्‍य योग्‍य दरात उपलब्‍ध करुण देण्‍यासाठी नवीन धोरण आखण्‍यात येत असून या धोरणामध्‍ये शेतक-यांची कुठेही फसवणूक होणार नाही याची खबरदारी घेण्‍यात येणार आहे.
कृषी व पणन  हे दोन्‍ही विभाग एकत्र असल्‍यामुळे कृषी उत्‍पादनाला प्रोत्‍साहन देण्‍यासोबतच कृषी मालाला योग भाव मिळण्‍यासाठी मदत होत असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले कृषी व पणन विभागातील अधिका-यांनी पारदर्शकपणे काम करावे तसेच प्रत्‍यक्ष फिल्‍डवर जावून पाहणी करावी व त्‍यानुसार शेतक-यांना मदत करावी अशी सूचनाही कृषीमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी यावेळी केली                                 
दत्‍ता मेघे आयुविज्ञाण अभिमत विद्यापिठाच्‍या कुलगुरुपदी नियुक्‍ती झाल्‍याबद्दल दिलीप संतोषराव गोडे यांचा शाल श्रीफळ, व भेट वस्‍तू देवून कृषीमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी गौरव केला. यावेळी डॉ. श्रीमती सुरिंदर गोडे यांचाही सत्‍कार करण्‍यात आला.
नागपूर सुधार प्रन्‍याचे विश्‍वस्‍त अनंतराव घारड,राधाकीबाई मेमोरीयलचे कोषाध्‍यक्ष सागर मेघे, आमदार विजय वडट्टीवार, डॉ.राजेंद्र गोडे, यांचे यावेळी डॉ. दिलीप गोडे यांची गुलगुरुपदी निवड झाल्‍याबद्दल अभिनंदनपर भाषणे झाली.
युथ वेल्‍फेअर सोसायटीचे अध्‍यक्ष संदिप मेघे यांनी  स्‍वागत करुण प्रास्‍ताविक भाषणात डॉ. दिलीप गोडे यांच्‍या वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदानाची माहिती दिली. प्रा. डॉ. प्रमोद येवले यांनी पाहुण्‍यांचा परिचय करुण दिला.
जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाडे यांनी शेतक-यासाठी तयार करण्‍यात आलेल्‍या कृषी तारण योजनेच्‍या पुस्तिकेची माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रदिप मेघे तर आभार प्रदर्शन डॉ. शिरीष गोडे यांनी मानले. यावेळी अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत,बोरगांव मेघे ग्रामपंचायतचे सरपंच देवानंदजी दखणे, अविनाश देशमुख, राजेश तरारे, सौ.भारती गोडे, प्रदिप मेघे, अर्चनाताई मेघे, अरुणभाऊ वसू तसेच विविध क्षेत्रातील गणमान्‍य व्‍यक्‍ती विविध संस्‍थांचे पदाधिकारी ,लोप्रतिनिधी,शेतकरी मोठयासंखेने उपस्थित होते.
00000                  

No comments:

Post a Comment