Saturday 3 November 2012

डेंग्‍यू आजाराच्‍या नियंत्रणासाठी विशेष कक्ष सुरु - एन.नविन सोना




            * डास निर्मुलनासाठी  शहरात तसेच ग्रामीण भागात विशेष मोहीम
                     * डेंग्‍यू  प्रतीबंधात्‍मक उपाययोजना प्राधान्‍याने  राबवा
            * पाणी स्‍वच्‍छतेसाठी  प्रत्‍येकाने ड्रायडे सक्‍तीने पाळा
            * 54 गावांमध्‍ये  विशेष  तपासणी मोहीम    

            वर्धा,दि. 3- डेंग्‍यूसह  किटकजन्‍य आजाराच्‍या   प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांसाठी  जिल्‍हा  आरोग्‍य  अधिकारी  यांच्‍या  नियंत्रणाखाली  विशेष कक्ष सुरु करण्‍यात आला असून, प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांसाठी  ग्रामीण व शहरी भागात  साचलेले पाणी , अस्‍वच्‍छता  निर्मूलनासह जनतेमध्‍ये  आरोग्‍याविषयी  जागृती निर्माण करण्‍यासाठी  विशेष  मोहीम  सुरु करण्‍यात आली असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी एन.नविन सोना यांनी आज दिली.
           डेंग्‍यूसह किटकजन्‍य  आजारामुळे  जिल्‍ह्यात  23 रुग्‍ण  बाधीत झाले असून, बाधीत रुग्‍णांवर  तात्‍काळ  औषधोपचारासह  इतर  उपाययोजनांचा  आढावा वरिष्‍ठ अधिका-यांच्‍या बैठकीत जिल्‍हाधिका-यांनी घेतला. यावेळी  मुख्‍य कार्यपालन अधिकारी  शेखर चन्‍ने , जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी  डॉ.माने,  जिल्‍हा शल्‍य  चिकित्‍सक मिलींद सोनवने , उपमुख्‍य कार्यपालन अधिकारी  आर.एम.भुयार, नगर परिषदेचे मुख्‍याधिकारी  यावेळी उपस्थित होते.
          शहरी व ग्रामीण भागात साचलेल्‍या  पाण्‍यामुळे  व अस्‍वच्‍छतेमुळे  डासांचा प्रादुर्भाव होत आहे. यावर नियंत्रणासाठी  फॉगिंग मशीनने तसेच फवारणी करुन डास निर्मूलनाची  मोहीम मोठ्या प्रमाणात राबवावी  अशी सुचना करताना  जिल्‍ह्यात  ज्‍या गावांमध्‍ये  डेंग्‍यूचे  रुग्‍ण  आढळून  आले त्‍या गावामधील  प्रत्‍येक  घरातील  सदस्‍यांची  आरोग्‍य  तपासणी करुन  आवश्‍यक  औषधोपचार  करावा अशा सुचना  करताना जिल्‍हाधिकारी  एन.नविन सोना  म्‍हणाले की प्रत्‍येक   गावात तसेच नगर परिषद क्षेत्रात   पाणी  साठवूण राहणार नाही तसेच आठवडृयातून  एक  दिवस सक्‍तीने ड्रायडे पाळण्‍याबाबत  विशेष मोहीम राबवावी .
        जिल्‍हा स्‍तरावर नियंत्रण कक्ष   तयार करुन  जिल्‍हा आरोग्‍य  अधिकारी  व जिल्‍हा शल्‍य  चिकित्‍सक यांनी  वैद्यकीय  संघटनांचे प्रतीनिधी  व खाजगी  रुग्‍णालयांचे  सहकार्य घेवून   ताप येणा-या  तसेच साथीची  लागण झालेल्‍या   प्रत्‍येक  रुग्‍णांची रक्‍त तपासणी होईल व त्‍याची  नोंद ठेवून औषधोपचार  नियमित मिळेल याची  खबरदारी घ्‍यावी.                                            
            साथ रोगाबाबत ज्‍या गावांमधून  रुग्‍ण  आढळले तसेच नवीन रुग्‍णांची  माहिती घेऊन खाजगी रुग्‍णालयात सुध्‍दा दाखल होणा-या  रुग्‍णांबाबतही  औषधोपचारावर नियंत्रण  ठेवावे तसेच  हातपंप, सार्वजनिक नळ येाजना, पिण्‍याच्‍या पाण्‍याचे विविध स्‍त्रोत या परिसरात  पाणी साचणार नाही याची दक्षता घ्‍यावी. व स्‍वच्‍छतेकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सुचना द्यावे अश्‍या सुचनाही जिल्‍हाधिकारी यांनी केल्‍यात.
          हिंगणघाट येथे साथ रोगाचे सर्वाधिक रुग्‍ण आढळले असून इतर जिल्‍ह्यातील गावांमध्‍ये फवारणी तसेच जनजागृती करीता विशेष ग्रामसभा घेऊन जनतेचा सहभागही घ्‍यावा. अशा सुचना करताना   वर्धा शहरामध्‍ये  विविध वस्‍त्‍यांमध्‍ये    फॉगिंग मशीनने धुरळणी करावी यासाठी  जिल्‍हा परिषदेकडे असणा-या मशीन उपलब्‍ध करुन द्याव्‍यात अशा सुचनाही यावेळी करण्‍यात आल्‍या.
          ग्रामीण भागात अस्‍वच्‍छ  वातावरणामुळे  डासांची उत्‍पत्‍ती   होते अशा ठिकाणी विशेष स्‍वच्‍छता  मोहीम राबवावी  अशा सुचनाही  मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने  यांनी ग्राम पंचायतींना दिल्‍यात. यासाठी ग्रामपंचायतींना जबाबदार धरण्‍यात येईल असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.
           डेंग्‍यूसह साथीच्‍या आजारासाठी जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात विशेष कक्ष सुरु करण्‍यात आला असल्‍याची  माहिती जिल्‍हा  शल्‍य चिकित्‍सक डॉ. मिलींद  सोणवने यांनी दिली.
                                                00000000

No comments:

Post a Comment