Thursday 8 September 2011

जिल्ह्यातील आठ जलाशये 100 टक्के भरलेले


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि. 8 सप्टेंबर 2011
---------------------------------------------------------------------------------
          
वर्धा,दि.8-वर्धा पाटबंधारे विभाग यांनी पाठविलेल्या अहवालानुसार आज दिनांक 8 सप्टेंबर 2011 रोजी जलाशयातील पाण्याच्या पातळीच्या स्थितीत सुधारणा झाली असून,आठ जलाशये 100 टक्के भरलेली आहे.
     धाम प्रकल्प महाकाली जलाशय पोथरा प्रकल्प  डोंगरगाव, पंचधारा, व मदन उन्नई,,वर्धा कार नदी प्रकल्प व सुकळी लघू प्रकल्प 100 टक्के, लालनाला 99.05 टक्के,नांद प्रकल्प 87.73 टक्के, वडगाव प्रकल्प 92.51 टक्के, उर्ध्व वर्धा धरण 95.32 टक्के, निम्न वर्धा प्रकल्प 11.38 टक्के, बेंबाळा प्रकल्प 39.19 टक्के भरलेले आहेत.
     धाम प्रकल्पातून 34 से.मी.ने 87.06 क्युसेस,पोथरा प्रकल्पातून 40 सें.मी.ने 101.68 क्युसेस, डोंगरगांव प्रकल्पातून 20 से.मी. ने 9.35 क्युसेस , पंचधारा प्रकल्पातून 5 से.मी. ने 2.44 क्युसेस, मदन उन्नई प्रकल्पातून 10 से.मी. ने 7.56 क्युसेस, मदन उन्नई धरणातून       15 सें.मी.ने 16.20 क्युसेस, वर्धा कार नदी प्रकल्पातून 20 से.मी.ने 33.38 क्युसेस व सुकळी लघू प्रकल्पातून 3 से.मी.ने 2 क्युसेस पाण्याचा विसर्ग सांडव्यावरुन होत आहे.
     बोर प्रकल्पाचे 3 व्दार 15 से.मी. ने उघडले असून त्यातून 32 क्युसेस,वडगाव प्रकल्पाचे 5 व्दार 25 से.मी. ने उघडले असून, त्यातून 138.30 क्युसेस,उर्ध्व वर्धा धरणाचे 11 व्दारे 15 से.मी. ने उघडले असून, त्यातून 620 क्युसेस,निम्न वर्धा धरणाचे 30 व्दारे 40 से.मी. ने उघडले असून, त्यातून 570 क्युसेस, बेंबाळा प्रकल्पाचे 2 व्दार 10 से.मी. ने उघडले असून, त्यातून 19.20 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. असे अहवालात नमुद आहे.
                       0000000000





No comments:

Post a Comment