Tuesday 6 September 2011

तुती लागवड व कोष उत्पादन योजना


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक       जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.6 सप्टेंबर 2011
---------------------------------------------------------------------------------
     वर्धा, दि.6- तुती लागवड व रेशीम कोष उत्पादनाची योजना अंतर्गत तुती लागवड करण्यास ईच्छूक शेतक-यांकडून सन 2011-12 च्या खरीप हंगामासाठी दिनांक 30 सप्टेंबर 2011 पर्यंत विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना व इतर माहीती रेशीम संचालनालयाची वेबसाईट www.mahasilk.gov.in   वर उपलब्ध आहे. तसेच जिल्हा रेशीम कार्यालयाकडे उपलब्ध आहे. अर्जाचा नमुन्या सेाबत रु. 500 रोखीने नोंदणी फी जमा करुन शेतक-यांनी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा रेशीम कार्यालयाकडे तुती लागवडीसाठी त्वरीत नोंदणी नोंदवावी.
     लाभार्थी पात्रतेमध्ये शेतक-यांकडे त्याचे नावावर किमान 20 आर क्षेत्र असावे. यांस कमाल मर्यादा नाही व शेतक-यांकडे सिंचनाची सोय उपलब्ध असावी.
     लाभार्थी सहाय्यतेत एका लाभार्थ्यांस किमान 0.20 हेक्टर ते कमाल 2 हेक्टर क्षेत्राचे लाभ देय असतील. त्यासाठी लाभार्थी     शेतक-यांना शासनाच्या  नियमानुसार 75 टक्के तुती झाडे जिवंत ठेवणे व रेशीम कोश उत्पादन घेणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. या दोन्ही बाबींची पुर्तता केल्यास राज्य शासनाच्या  जिल्हा वार्षिक योजना, रोजगार हमी योजना व केंद्रीय रेशीम मंडळाच्या योजनांमधून त्यांना आर्थीक अनुदान उपलब्ध करुन देण्यात येईल. तेव्हा तुती लागवडीस ईच्छूक शेतक-यांनी त्वरीत या कार्यालयाशी संपर्क साधून तुती लागवडीकरीता विहीत नमुनयात अर्ज सादर करावेत असे आवाहन रेशीम विकास अधिकारी,वर्धा यांनी केले आहे.
                             00000

No comments:

Post a Comment