Wednesday 7 September 2011

रोजगार हमी योजना समितीची विविध कामांना भेटी


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि. 7 सप्टेंबर 2011
---------------------------------------------------------------------------------
    वर्धा, दि. 7- वर्धा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या रोजगार हमी योजने अंतर्गत विविध विकास कामांची पाहणी आज विधान मंडळाच्या रोजगार हमी योजनेचे प्रमुख आमदार विरेंद्र जगताप व समित्याच्या सदस्यांनी केली.
     समितीच्या सदस्यामध्ये आमदार विजयराज शिंदे, आमदार केशवराव मानकर, आमदार दादाराव केचे, आमदार सुरेशकुमार जथलीया, आमदार दिलीपराव वाघ, आमदार सुधिर पारवे, आमदार सुभाष चव्हाण, आमदार सिध्रामप्पा पाटील, आमदार दिनकरराव पडोळे, आमदार संजय राठोड यांचा समावेश आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी जयश्री भोज, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर चन्ने, सहसचिव मु.के.चव्हाण, अवर सचिव काळे, जिल्ह्यातील पदाधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
     सर्वप्रथम दहेगाव व लोनसावळी येथील नाला सरळीकरण, आर्वी तालुक्यातील रसुलाबाद येथील रोजगार हमी योजने अंतर्गत तयार करण्यात येत असलेली रस्त्याचे काम, नांदोरा येथे ग्रामपंचायत यांनी तयार केलेला शोष खड्डयाचे काम तसेच सारंगपूरी तलावाला व इतर कामांना भेट देवून पाहणी केली.
     यावेळी कामावरील मजूरासोबत व गावक-यां बरोबर चर्चा करण्यात आली.

                           00000

No comments:

Post a Comment