Tuesday 6 September 2011

वाठोडा गावाचे पूर्नवसनासाठी 8 कोटीचे अनुदान पालकमंत्र्यांचे प्रयत्नामुळे तातडीने मंजूर


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.6 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
      
वर्धा,दि.6-आर्वी तालुक्यातील वाठोडा गावाच्‍या पुर्नवसनासाठी अनुदानाचा प्रस्ताव शासन दरबारी अनेक दिवसापासून प्रलंबित होता. मात्र या प्रकरणी माजी आमदार अमर काळे यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे व पालकमंत्री राजेंद्र मुळक यांच्या अथक प्रयत्नामुळे वाठोडा गावाचे पूर्नवसनासाठी 8 कोटी रुपयाचे अनुदान शासनाने उपलब्ध करुन दिले असून, त्या रकमेचे वितरण आज पासून सुरु झालेले आहे.
निम्न वर्धा प्रकल्पातील मौजे वाठोडा ता.आर्वी येथील बुडीत क्षेत्रातील गावठाणातील घरे संपादित केलेल्या भुखंड धारकांना न्यायालयात दाद मागणा-या व दावे मागे न घेणा-या 22 प्रकल्पग्रस्तांना वगळून उर्वरित प्रकल्प धारकांना 12 कोटी 2 लक्ष 35 हजार 776 एवढ्या रकमेचे पूर्नवसन अनुदान प्रस्तावास शासनाने मंजूरी प्रदान केलेली असून, त्यापैकी 8 कोटी रुपये शासनाने नुकतेच उपलब्ध करुन दिले असून, त्याचे वितरणास प्रारंभ झाला आहे.
या प्रकरणाचा अंतिम निवाडा दिनांक 19 मे 2006 रोजी पारित करण्यात आला असून, पूर्नवसन करण्यासंबधीची कार्यवाही संपादन संस्था तसेच जिल्हा पूर्नवसन अधिकारी यांच्या कडून पूर्ण करण्यात आली असून, 926 भुधारकापैकी 826 भुधारकांना पूनर्वसन अनुदान मिळणेकरीता जिल्हाधिकारी वर्धा यांनी दिनांक 6 सप्टेंबर 2010 अन्वये शासनाला पाठविलेल्या पत्रानुसार तसेच 15 डिसेंबर 1983 मधील तरतुदीच्या विशिष्ट अटीची पूर्तता केल्यामुळे लाभार्थ्यांना पात्र ठरविण्यात आले आहे.
यासाठी माजी आमदार अमर काळे यांच्या आग्रही भुमिकेमुळे व पालकमंत्री मुळक यांच्या प्रयत्नामुळे सदर्हू अनुदानाच्या प्रस्तावाला गती मिळाली. त्यामुळे सदर्हू अनुदानही उपलब्ध झाले असून,वाठोडा गावातील ग्रामस्थांना प्राप्त होणा-या रकमेतून मोठा दिलासा मिळणार आहे.अशी माहिती पालकमंत्र्यांच्या स्विय सहाय्यकाने दिली आहे.
                        000000

No comments:

Post a Comment