Tuesday 6 September 2011

पोषण व आरोग्य या विषयावर प्रशिक्षण


                   महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.6 सप्टेंबर 2011
--------------------------------------------------------------------                    

      वर्धा, दि. 6- सामुदायीक खाद्य आणि पोषक आहार विस्तार युनीट महिला व बाल कल्याण विभाग केंद्रिय मंत्रालय, नागपूर महिला व बाल कल्याण विभाग, जि.प.वर्धा व एकात्मिक बाल विकास सेवा योजना, आर्वी यांचे संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय पोषण व आरोग्य या विषयावर आधारित प्रशिक्षण पाठ्यक्रम नुकतेच आर्वी येथील  जिल्हा परिषद कन्या शाळेत संपन्न झाले. या  प्रशिक्षणास आर्वी तालुक्यातील 30 अंगणवाडी सेविकांनी भाग घेतला होता.
     या प्रशिक्षणाचे उदघाटन महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती रजनीताई देशमुख यांनी केले. पंचायत समिती आर्वीच्या उपसभापती मिनाताई देशमुख, जि.प.च्या माजी अध्यक्षा कलावतीताई वाकोडकर, जि.प. सदस्य चंद्रकांत कांडलकर, तृप्तीताई पावडे, पंचायत समिती सदस्य चित्राताई कुकडे मंचावर उपस्थित होते. प्रा.अंजली देशमुख यांनी  आहारविषयक मार्गदर्शन केले. नागपूर येथील  प्रमुख खाद्य आणि पोषण युनिटचे मुकुंद माहोरे यांनी महिला व बालकातील कुपोषण कमी करण्यासाठी विविध उपाय सांगितले. प्रशिक्षणात आहाराबाबत मुलभुत माहिती स्तनपान वृध्दी संनियंत्रण, लहान मुलामधील कुपोषण व आजार गर्भवती स्तनदा व किशोरवयीन मुलीचा आहार आरोग्य वैयक्तिक स्वच्छता,शुध्द पेयजल इत्यादी विषयावर तज्ञ मंडळींनी मार्गदर्शन केले.
     वैयक्तिक व पर्यावरण स्वच्छता याबाबत विस्तार अधिकारी बोचरे, बालरोग तज्ञ डॉ. कोल्हे यांनी गर्भवती स्तनदा माता व किशोरी मुलीचया आरोग्याची देखभाल व बालकांच्या  कुपोषणाबाबत डॉ. राणे यांनी कुपोषणावरील माहिती दिली. या कार्यक्रमाची सांगता संजय वानखेडे यांनी केली.
या कार्यक्रमाकरीता कार्यालयीन सर्व कर्मचा-यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय वानखेडे तसेच आभार प्रदर्शन रेखा यावले यांनी मानले. असे बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, आर्वी यांनी कळविले आहे.
  00000

No comments:

Post a Comment