Friday 9 September 2011

पर्यावरणपुरक सणांचे साजरीकरणासाठी मार्गदर्शक सुचनाचे पालन करण्यासाठी आवाहन


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक              जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.9 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------------
               
     वर्धा,दि.9-महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण विभागाचे दि.3 मे 2011 निर्णयान्वये पर्यावरणपुरक सणांचे साजरीकरणासाठी मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या आहेत. त्या सुचनांचे पालन करण्यासाठी जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी आवाहन केले आहे.
     सदर मार्गदर्शक सुचनांच्या अनुषंगाने वर्धा जिल्ह्यात दिनांक 1 सप्टेंबर 2011 पासुन सुरु झालेल्या गणेशोत्सव व आगामी गणेश विसर्जन, दुर्गात्सव, दिपावली यासह इतर विविध सणांच्या साजरी करण्याच्या वेळी सर्वसाधारण पणे प्रदुषित होणारे जल,हवा घटकांचे प्रदुषण रोखण्यासाठी जसे नद्या, सरोवरे,समुद्र सारख्या जलाशयात मुर्त्यांचे विसर्जन टाळण्याकरीता विविध सामाजिक संस्था/ संघटना यांचे मार्फत तयार करण्यात आलेल्या पर्यायी कृत्रिम तलाव, कुंड सारख्या जलाशयाचा वापर करावा. याशिवाय पर्यावरण प्रदुषण रोखण्याच्या दृष्टीने जनतेने, सार्वजनिक मंडळानी, विविध संस्थांनी/ संघटनानी सर्वतोपरी प्रयत्न करावे असे प्रसिध्दी पत्रकात नमुद आहे.
                              0000



No comments:

Post a Comment