Wednesday 7 September 2011

राज्यस्तरीय विज्ञान मेळावा


 महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि. 7 सप्टेंबर 2011
---------------------------------------------------------------------------------
       
वर्धा,दि.7- राज्यस्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन राज्य विज्ञान शिक्षण संस्था रविनगर नागपूर व शिक्षण विभाग जिल्हा परिषद,वर्धा यांचे संयुक्त विद्यमाने न्यु आर्ट्स कॉमर्स व सायन्स महाविद्यालय, वर्धा येथे दि.8 सप्टेंबर 2011 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे.
सन 2011-12 च्या विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचा विषय ``मानवाच्या उत्थानासाठी रसायनशास्त्र- अपेक्षा व परिणाम`` असा आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातील एकूण आठ शैक्षणिक विभागातून निवडक 16 विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
या मेळाव्याचे उदघाटन महिला विकास संस्थेचे सचिव डॉ. पंकज भोयर यांचे हस्ते होणार असून, बक्षिस वितरण व समारोप जि.प.चे शिक्षण व आरोग्य समिती सभापती मोरेश्र्वर खोडके करणार आहेत. अशी माहिती शिक्षणाधिकारी (माध्य.)चे लक्ष्मीनारायण सोनवणे यांनी दिली आहे.
                     00000

No comments:

Post a Comment