·
बुधवार दिनांक 1 ऑगष्ट रोजी आयोजन
·
तालुका व जिल्हा स्तरावर विविध कार्यक्रम
·
विविध प्रकारचे दाखले,सातबारा फेरफार करणार
वर्धा दि.30- महसूल
विभागातर्फे जनतेला लोकाभिमुख व गतीमान प्रशासन देण्यासाठी सुवर्ण जयंती राजस्व
अभियान राबविण्यात येत असून बुधवार दिनांक 1 ऑगष्ट रोजी तालुका व जिल्हा स्तरावर
महसूल दिनाचे आयोजन करुन सातबारा,फेरफारासह विविध दाखले देण्यात येणार असल्याची
माहिती अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत
यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महसूल दिन
आयोजनाबाबत वरिष्ठ महसूल अधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी
निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती विजया बनकर, उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम,
उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक, सर्व तहसिलदार उपस्थित होते.
महसूल दिनाचे आयोजन करतांना महसूल विभागाशी संबंधित जनतेची
सर्व कामे त्वरीत निकाली निघतील तसेच सातबारासह इतर आवश्यक प्रमाणपत्र या
कार्यक्रमामध्ये उपलब्ध करुन देण्यात यावीत अशा सूचना करतांना संजय भागवत म्हणाले
की, महसूल दिनी तालुका व जिल्हा स्तरावर उत्कृष्ट काम करणा-या कर्मचा-यांचाही
सत्कार करण्यात येईल.
महसूल दिना सोबतच सुवर्ण जयंती राजस्व अभियानालाही सुरवात
होत असून या अभियाना अंतर्गत ग्रामीण भागात शेतीसाठी आवश्यक असलेले पांदन रस्ते,विविध
दाखले देण्यासाठी विविध शिबीराचे आयोजन करणे जनतेची गा-हाणी तसेच तक्रारी सोडविण्यासाठी चावडी वाचन अर्जाचे सुलभिकरण व ऑनलाईन उपलब्ध
करुन देणे आदी विविध कार्यक्रमाचेही वर्षभर आयोजन करण्यात येणार आहे.
वृक्षारोपण करणार
महसूल दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयाच्या
आवारात वृक्षारोपण करुन महसूल दिन साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमात कुटूंब
अर्थसहाय्य योजना, श्रावणबाळ आदी सहाय्याच्या योजनासह विविध लाभार्थ्यांना
अनुदानाचे वाटपही यावेळी करण्यात येईल.
तलाठी साजा स्तरावर सकाळी गावक-यांच्या सहकार्यांने महसूल
दिन आयोजित करण्यात येईल. यामध्ये जमावबंदी,सातबारा,फेरफार नोंदी घेणे विविध
प्रकारचे दाखले देणे व महसूल विभागाची प्रलंबित कामे पूर्ण करण्यात येतील.
जिल्हा स्तरावरही महसूल दिन आयोजित करण्यात येणार असून
उपिवभागीय, तहसिलदार वर्धा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने विकास भवन
येथे कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.
जनतेसाठी हेल्पलाईन
महसूल विभागाशी संबंधित असलेली माहिती जनतेला मिळावी यासाठी
जिल्हा स्तरावर हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे, हेल्पलाईनसाठी दूरध्वनी
क्रमांक 07152- 243446
या क्रमांकावर जनतेला माहिती उपलब्ध होणार आहे. जनतेनी या हेल्पलाईनचा लाभ घ्यावा
असे आवाहनही अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी केले.
निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती विजया बनकर यांनी महसूल
दिनाच्या आयोजनाची माहिती दिली.
यावेळी तहसिलदार सुशांत बनसोडे (वर्धा) जे.टी.पुरके (हिंगणघाट)
जी.एन.करलुके (आर्वी) प्रकाश महाजन (आष्टी) एस.जे.मडावी (कारंजा) ए.जी.गावीत
(सेलू) सचिन गोसावी (देवळी) आदी यावेळी उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment