·
लाईफ जॅकेट, रोप अॅण्ड रेक्युकीट
·
पूरग्रस्त गावासाठी आवश्यक साहित्य रवाना
·
पोलीस व महसूल विभागासाठी आधुनिक साहित्य
वर्धा दि.30 – अतिवृष्टी,पूर तसेच
जिल्ह्यातील उदभवना-या नैसर्गीक आपत्तीचा सामना करण्यासाठी लाईफ
जॉकेट सह रोप अॅण्ड रेक्युकीट, मेगाफोन ,सर्च लाईटसह आवश्यक साहित्य उपलब्ध
झाले आहे. आपत्ती निवारणार्थ आवश्यक असलेले सर्व साहित्य जिल्हा व तालुका स्तरावरील
नैसर्गीक आपत्ती निवारण कक्षामध्ये सज्ज असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी
संजय भागवत यांनी दिली.
आपत्ती
निवारणासाठी जिल्ह्यास आवश्यक असलेले
साहित्य उपलब्ध झाले असून आज संपूर्ण साहित्य आपत्ती निवारण कक्षाकडे रवाना
करण्यात आले.
जिल्ह्यास
नैसर्गीक आपत्ती नियंत्रणासाठी प्राप्त झालेल्या साहित्यामध्ये 160 लाईफ जॅकेट,
25 मेघाफोन, 24 फोल्डींग स्ट्रेचर, दोन रोप अॅण्ड रेक्यु किट, 25 सर्च लाईट,
280 ड्रम व 280 ट्युब आदी साहित्याचा समावेश आहे.
सर्व
साहित्य तालुकास्तरावर ज्या गावांना पुरांचा धोका आहे अशा गावासाठी उपलब्ध
करुन देण्यात येणार असून आपत्ती निवारणाचा सामना करण्यासाठी अधिका-यांना व
कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
जिल्हा
पोलीस अधिक्षक व सर्व तहसिल कार्यालयामध्ये लॉईफ जॅकेटसह आवश्यक साहित्य उपलब्ध
करुन देण्यात आले आहे. जिल्हा स्तरावर नैसर्गीक आपत्तीचा सामना करण्यासाठी
यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
यावेळी
निवासी उपजिल्हाधिकारी सुश्री विजया बनकर, उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक,
तहसिलदार सुशांत बनसोडे, सचिन गोसावी, ए.जी.गावीत, जी.एन.करलुके, अनिल दलाल, राहुल
सारंग, एस.जे.मडावी,जी.टी.पुरके, यु.एस.तोडसाम, आदींनी आपदा प्रबोधनासाठी साहित्यांच्या उपयोगाबाबत माहिती घेतली.
आपत्ती
व्यवस्थापन कक्ष प्रमुख किशोर सोनटक्के यांनी नैसर्गीक आपत्ती निवारणासाठी
उपलब्ध सुविधांची माहिती दिली.
0000
No comments:
Post a Comment