Wednesday 19 September 2012

शनिवारी पायी चाला प्रदुषण टाळा


 वर्धा, दि. 19- वाहनांची वाढती संख्‍या व त्‍यामुळे होणारे प्रदुषण कमी करण्‍याच्‍या उदे्शाने शनिवार दिनांक 22 सप्‍टेंबर,2012 प्रदुषणमुक्‍त दिवस म्‍हणून पाळण्‍यात येणार   आहे. प्रत्‍येकाने वाहनांचा वापर टाळून एक दिवस पायी चालून पर्यावरण संवर्धणाला सहकार्य करावे असे आवाहन सामाजीक वणीकरण विभागाचे उपसंचालक प्रविणकुमार बडगे यांनी केले आहे.
          22 सप्‍टेंबर हा दिवस जागतिक कार विरहीत दिन म्‍हणून पाळण्‍यात येतो.वाहनांच्‍या वाढत्‍या वापरामुळे होणारा प्रदुषण कमी करण्‍यासाठी सर्व नागरीक, अधिकारी,कर्मचारी,शासकीय कार्यालय, सेवाभावी संस्‍था,शैक्षणिक संस्‍था, राष्‍ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी आणि सर्व निसर्ग प्रेमींनी या दिवशी शासकीय,खाजगी वाहनांचा कमीत कमी वापर करुन त्‍याऐवजी सार्वजनिक वाहनाचा वापर करावा.आणि  प्रदुषण कमी करुन पर्यावरणाचा समतोल राखणे कामी सहकार्य करावे असे आवाहनही प्रविणकुमार बडगे यांनी केले आहे.
          कार विरहित दिन पाळतांना शक्‍यतो शनिवारी कार्यालयात किंवा आस्‍थापनात येतांना कुढल्‍याही प्रदुषण पसरविणा-या वाहनांचा उपयोग टाळावा.
          सर्व अधिकारी,कर्मचारी यांनी शक्‍यतोवर दिनांक 22 सप्‍टेंबर,2012 रोजी शासकीय,खाजगी वाहनांचा कमीत कमी वापर करावा, प्रदुषण न करणा-या सायकल सारख्‍या वाहनांचा वापर करण्‍यात यावा, शक्‍य तेवढा जास्‍त सार्वजनिक वाहनाचा वापर करावा, एकाच ठिकाणी, एकाच मार्गावर कार्यालये,आस्‍थापना असल्‍यास जास्‍तीत जास्‍त अधिकारी,कर्मचारी यांनी मिळून एकाच चारचाकी वाहनांचा वापर करावा असेही आवाहन प्रविणकुमार बडगे यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment