Friday 21 September 2012

कापूस कीडीच्‍या नियंत्राणासाठी उपाययोजना



      वर्धा, दि.21- आर्वी उपविभागातील कारंजा तालुक्‍यात बोंदडठाणा, धर्ती, एकांबा, नरसिंगपुर, रानवाडी ,सेलगाव, सुसुंद्रा व ठाणेगाव या भागात कापुस पिकावर पांढरी माशी या कीडींचा प्रादुर्भावामुळे आर्थिक नुकसान पातळीचे जवळ आढळलेला आहे. या किडीचे नियंत्रण करण्‍यासाठी शेतक-यांनी पुढील प्रमाणे उपाययोजना  सुचविण्‍यात येत आहेत.
      पिकाचे वेळोवेळी बारकाईने निरीक्षण करावे, पिकात हेक्‍टरी 10 ते 12 पिवळे चिकट सापळे लावावे. कपाशी भोवती मका, चवळी, झेंडू व एरंडी या सापळा पिकांची पेरणी करावी. सोबतच निंबोळी तेल 50 मिली अथवा डायमेथोईट 30 ईसी. 10 मिली किंवा असिटामेप्रिड 20 टक्‍के 4 ग्रॅम अथवा अॅसिफट 75 टक्‍के 20 ग्रॅम अथवा ट्रायझोफॉस 40 टक्‍के 20 मिली यापैकी कोणती एक औषध 10 लिटर पाण्‍यात मिसळुन फवारावे. गरजेनुसार 8-10 दिवसाचे अंतराने वरील शिफारस केलेले अन्‍य किटकनाशकाची फवारणी करावी.
     ढगाळ वातावरणात फवरणी करताना स्टिकर 2 मिली लिटर पाण्‍यात मिसळावे. फवारणी शक्‍यतो वारा स्थिर असताना, सकाळी लवकर वा उशिरा  दुपारनंतर करावी. पानाचे खालचे भागात व बांधावरही फवारणी करावी. पॉवर पंप वापरताना कीटकनाशक मात्रा 2.5 ते 3 पट ठेवावी.
      शेतकरी बांधवांनी तातडीने सुचविलेल्‍या उपाययोजना कराव्‍यात व गाव पातळीवर सविस्‍तर मार्गदर्शनासाठी कृषि सहाय्यक , किड सर्वेक्षक यांना संपर्क साधावा असे आवाहन आर्वीचे उपविभागीय कृषी अधिकारी मुकुंद येवले यांनी केले आहे.
                                            00000

No comments:

Post a Comment