Sunday 16 September 2012

समजस्‍याची भावना ठेवून दाव्‍याचा निपटारा करावा - न्‍या. शिवणकर

वर्धा, दि. 16 – पक्षकारांचा वेळ व पैसा वाचविण्‍याचे व्‍यासपीठ हे लोकन्‍यालय समजल्‍या जाते प्रत्‍येक तारखेवर पक्षकांराचा होणारा मानसिक त्रास लोकन्‍यायालयामुळे सपुष्‍टात येऊ शकतात  या करीता वादी व प्रतिवादी पक्षकारांनी सामंजस्‍यापणाची भुमिका ठेवून आपल्‍या दाव्‍याचा निपटारा तातडीने करावा. असे आवाहन प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश तसेच जिल्‍हा विधिसेवा प्राधिकरणाचे अध्‍यक्ष न्‍या . अशोक शिवणकर यांनी केले.
          येथील जिल्‍हा सेवा प्राधिकरण वर्धा यांच्‍या सभागृहात महालोक अदालतीचे उदघाटन दिपप्रज्‍वलीत करुन झाले. त्‍यावेळी अध्‍यक्षपदावर ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्‍हा बार असोशिनचे अध्‍यक्ष अॅड. अशोक दौड व दिवाणी न्‍यायाधिश वरिष्‍ठ स्‍तर तथा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्‍य सचिव एस.एम.येलेट्टी आदी मान्‍यवर उपस्थित होते.
          न्‍यायालयातील प्रलंबित प्रकरणाचा निपटारा तातडीने होण्‍यासाठी महालोक अदालतीचे आयोजन करण्‍यात आले. असल्‍याचे सांगून न्‍या.शिवणकर म्‍हणाले की, या महालोक अदालतीमुळे आपसी दाव्‍याचा निकाल समोपचाराने लागत असल्‍यामुळे दोन्‍ही पक्ष समाधानी होऊन घरी परत जात असतात यामुळे समाजात एक चांगला फायंदा व वातावरण तयार होत असून आपसी वैर भावना सपुष्‍ठात येत असते असेही ते म्‍हणाले.
 याप्रसंगी बेालतांना अॅड.दौड म्‍हणाले की, प्रलंबित न्‍यालयीन प्रकरणांना त्‍वरीत निकाली काढण्‍यासाठी महालोक अदालद महत्‍वपुर्ण भुमिका निभावीत असते. यांत सहभागी वादी व प्रतीवादी यांना त्‍वरीत न्‍याय मिळतो. उलट मनामध्‍ये असलेली कुटुता दुर होऊन समाजात आंनदाचे वातावरण निर्माण होते. वेळ व पैसा त्‍या सोबत वाढलेल्‍या त्रासामुळे पक्षकारांना दिलासा मिळत असतो असेही ते म्‍हणाले.
            या महालोक आदालतीमध्‍ये 14 पॅनल राहणार असून त्‍यामध्‍ये प्रमुख न्‍यायाधिश पॅनल सदस्‍य अभियोक्‍ता व सामाजसेवक तसेच न्‍यायीक कर्मचा-यांचा समावेश असेल. या महालोक अदालतीमध्‍ये मोटार वाहन अपघात प्रकरणे, दिवाणी व फौजदारी अपिल व विद्युत कायदयाचे प्रकरणे, भुसंपादनाची प्रकरणे, विवाह कायदा व दिवाणी दावे, फौजदारी व वैवाहीक प्रकरणे, बँकेची प्रकरणे व बिएसएनल संबंधी प्रकरणाचा समावेश आहे.
    कार्यक्रमाचे संचलन व आभार अधिक्षक ता.ग.पठाण यांनी मानले.यावेळी न्‍यायधिश समाज सेवक, अधिवक्‍ता न्‍यायाधिश कर्मचारी व पक्षकार मोठया संख्‍येने उपस्थित होते.
                                                   

No comments:

Post a Comment