Saturday 15 September 2012

शेतकरी आत्‍महत्‍याची चार प्रकरणे पात्र' एक प्रकरण फेरचौकशीसाठी – अप्‍पर जिल्‍हाधिकारी


      वर्धा, दि. 15 – शेतकरी आत्‍महत्‍या आढावा समितीची बैठक आज अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांच्‍या अध्‍यक्षतेखाली त्‍यांच्‍या  कक्षामध्‍ये संपन्‍न झाली. यावेळी समितीसमोर नऊ प्रकरणे विचारार्थ ठेवण्‍यात आली. त्‍यापैकी चार प्रकरणे पात्र व एक प्रकरण फेरचोकशीसाठी पाठविण्‍यात आल्‍याची माहिती अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी दिली.
     याप्रसंगी स्‍वयंसेवी संघटनेचे प्रतिनिधी म्‍हणून डॉ. सोहम पंड्या, शेतकरी  भुषण पुरस्‍कार प्राप्‍त शेतकरी डॉ. नंदकिशोर तोटे, अनिल मेघे  व अग्रणी बँकेचे प्रतिनिधी यावेळी   उपस्थित होते.
            शेतकरी आत्‍महत्‍या आढावा समितीच्‍या बैठकीत सर्वानुमते पात्र ठरविण्‍यात आलेल्‍या प्रकरणांमध्‍ये सेलू तालुक्‍यातील महाबळा येथील मानीक नेहारे, आर्वी तालुक्‍यातील मदना येथील महेश  झोटिंग, देवळी तालुक्‍यातील  इंझाळा येथील वर्षा बरडे व वर्धा तालुक्‍यातील पवनार येथील अंतकला हिवरे यांचा समावेश असून प्रकरणाच्‍या फेरचौकशीसाठी वर्धा तालुक्‍यातील पालोती येथील देविदास  उगेमुगे  यांचा समावेश आहे. तीन प्रकरणे अपात्र ठरविण्‍यात आलेली असून, एक प्रकरण आत्‍महत्‍याच्‍या प्रवर्गातून वगळण्‍यात आले आहे.
      यावेळी इतीवृत्‍ताचे वाचन शेतकरी आत्‍महत्‍या कक्षाचे श्री. श्रीवास्‍तव यांनी केले.
                                                              00000

No comments:

Post a Comment