Friday 14 September 2012

रोजगार हमी योजनेतून प्रत्‍येक गावात


जलसंधारणासह उत्‍पादक कामे घ्‍या-         शेखर चन्‍ने
       वर्धा, दि. 14- महात्‍मा गांधी  राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामीण भागात जलसंधारणासह विविध उत्‍पादक  कामांची  निवड करताना गावांच्‍या स्‍थानिक गरजानुसार कामांचे नियेाजन करा. अशा सुचना जि.प.चे मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने यांनी आज केले.
      विकास भवन येथे मग्रारोहयो  अंतर्गत जिल्‍ह्यात  कामांच्‍या नियोजपपूर्व तांत्रिक अधिकारी  यांचेसाठी आयोजीत कार्यशाळेच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
            अध्‍यक्षस्‍थानी जिल्‍हाधिकारी श्रीमती  भोज होत्‍या तर प्रमुख पाहुणे म्‍हणून उपजिल्‍हाधिकारी  श्री. संगीतराव , उपमुख्‍य कार्यपालन अधिकारी श्री. भुयार, उपविभागीय अभियंता सुनिल गहाणे, संजय उगेमुगे, सहायक भुवैज्ञानिक नितीन महाजन आदी उपस्थित होते.
           केंद्र शासनाने  महात्‍मा गांधी  राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत गावांचे स्‍थानिक गरजेनुसार कामाची निवड करण्‍यासाठी  शिवारफेरी  हा उपक्रम सुरु केला आहे. वर्धा जिल्‍ह्यात या उपक्रमानुसार प्रत्‍येक  गावामध्‍ये  कामाचे नियेाजन करावे व गावांमध्‍ये स्‍थायी मालमत्‍ता निर्माण करावी अशा सुचनाही यावेळी  जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी अधिका-यांना दिलयात.
            रोजगार हमी योजने अंतर्गत कामाची निवड करताना स्‍थानिक दर्जा त्‍यानुसार उपलब्‍ध होणारा रोजगार  अशा कामांचे  अंदाजपत्रक तयार करुन  कामांची  प्रत्‍यक्ष अंमलबजावणी करावी . मजूरांकडून झालेल्‍या   कामांचे मोजमाप घेऊन त्‍यांना लवकरात लवकर मजुरी प्रदान करण्‍याच्‍या दृष्‍टीने   प्रयत्‍न करावेत असेही त्‍यांनी सांगितले.
            उपजिल्‍हाधिकारी जे.बी. संगीतराव यांनी  मग्रारोहयो अंतर्गत  गुणवत्‍तापूर्ण  व स्‍थायी  मालमत्‍ता  तयार करण्‍यास प्राधान्‍य देत असल्‍याचे सांगताना सर्व अभियंत्‍यांनी  मार्गदर्शक सुचनानुसार   त्‍वरीत प्रत्‍यक्ष कामाला सुरुवात करावी , कामाचे नियोजन करताना  प्रशासकीय अडचणी अथवा  जेथे गरज भासेल तेथे  संपूर्ण मार्गदर्शन करण्‍यात येईल असेही त्‍यांनी  यावेळी स्‍पष्‍ट केले.
        या कार्यशाळेत 300 तांत्रिक अधिकारी  उपस्थित असून, त्‍यांना तज्ञ मार्गदर्शक श्री.मेघावत,श्री.कोरान्‍ने, श्री.भागवतकर, अभय तिजारे, सहायक लेखाधिकारी श्री. बोरकर आदींनी मार्गदर्शन केले.
      उत्‍कृष्‍ट कार्याबद्दल रोहयोचे उपविभागीय अभियंता सुनील रहाणे, उपअभियंता संजय उगेमुगे, सहायक भुवैज्ञानिक नितीन महाजन, शाखा अभियंता अभय क-हाडे, सहायक उपवनसंरक्षक विनोद देशमुख यांना प्रशस्‍ती पत्र देऊन गौरविण्‍यात आले.
            उपमुख्‍यकार्यपालन अधिकारी श्री. भुयार यांनी स्‍वागत करुन प्रास्‍तावी केले. तर कार्यक्रमाचे संचलन अजय धर्माधिकारी यांनी केले.
                                                              00000

No comments:

Post a Comment