Thursday 13 September 2012

झुडपी जंगलाच्‍या जमिनीवर वृक्षारोपन करा -रणजित कांबळे


                     *    जिल्‍हा परिषदेमार्फत वृक्षारोपण
                *  ग्रामपंचायतीला वृक्षारोपन व संगोपनाची जबाबदारी

वर्धा दि.13- ग्रामीण भागात झुडपी जंगल म्‍हणून नोंद असलेल्‍या जमिनीवर शतकोटी वृक्षारोपण मोहिमे अंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन करण्‍यासाठी वन विभागाने जिल्‍हा परिषदेला जागा उपलब्‍ध करुन देण्‍याची अशी सूचना पाणीपुरवठा व स्‍वच्‍ठता विभागाचे राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांनी आज केली.
            विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.यावेळी जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे,मुख्‍यकार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने,अप्‍पर जिल्‍हाधिकारी संजय भागवत,उपवनसंरक्षक प्रविण चव्‍हाण तसेच वरिष्‍ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
           ग्रामीण भागात वनविभागातर्फे  झुडपी जंगल म्‍हणून नोंद असलेली मोकळी जागा मोठ्या प्रमाणात आहे.या जागेवर अतिक्रमण होवू नये यादृष्‍टीने अशा जागा जिल्‍हा परिषदेला वृक्षारोपणासाठी उपलब्‍ध करुन द्याव्‍यात अशी सूचना राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांनी दिल्‍यात.
          ग्रामपंचायत स्‍तरावर वृक्षारोपण केल्‍यास ग्रामपंचायत वृक्षारोपणासोबत संवर्धनाचेही काम करेल तसेच या उपक्रमामुळे ग्रामपंचायतींना उत्‍पन्‍न सुध्‍दा होईल.वृक्षारोपण करतांना सुबाभुळ सारख्‍या झाडांचे वृक्षारोपन मोठ्याप्रमाणात करावे अशी सूचनाही त्‍यांनी केली.
           जिल्‍हा परिषदेचे मुख्‍यकार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने यांनी शतकोटी वृक्षारोपन मोहिमे अंतर्गत जिल्‍ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहिम जिल्‍हा परिषदेमार्फत राबविण्‍यात येणार आहे.वृक्षारोपणासाठी वनविभागातर्फे झुडपी जंगलाची जागा जेथे वृक्षारोपण करणे शक्‍य आहे अशी सर्व जागा उपलब्‍ध करुन द्यावी असेही बैठकीत त्‍यांनी यावेळी सांगितले.
                              वनविभागातर्फे 14 लाख रोपे
         वनविभागातर्फे शतकोटी वृक्षारोपण मोहिमे अंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन मोहिम राबविण्‍यात येत असून वन विभागाच्‍या नर्सरीमध्‍ये सुमारे 14 लाख रोपे तयार असल्‍याची माहिती उपवनसंरक्षक प्रविण चव्‍हाण यांनी दिली.
          जिल्‍ह्यात वर्धा शहराच्‍या सभोवताल तसेच ग्रामीण भागात झुडपी जंगल अशी नोंद असलेली वनविभागाचह जमिण आहे येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण शक्‍य आहे.वृक्षारोपणासाठी जिल्‍हापरिषद,ग्रामपंचायत तसेच स्‍वयंसेवी संस्‍थांचा सहभाग घेवून वृक्षारोपन करण्‍याबाबतचा प्रस्‍ताव शासनास सादर करण्‍यात आला असल्‍याची माहिती उपवनसंरक्षक प्रविण चव्‍हाण यांनी दिली.
0000

No comments:

Post a Comment