Monday 10 September 2012

जिल्‍हा वार्षिक योजनेतील कामे प्राधान्‍याने पुर्ण करा - जयश्री भोज



* जिल्‍ह्यातील विकास कामासाठी 53 कोटी 92 लाख रुपये प्राप्‍त  
* विविध विकास योजनांवर 32 टक्‍के खर्च

          वर्धा, दि. 10 – वर्धा जिल्‍ह्याच्‍या सर्वांगिन विकासासाठी  जिल्‍हा वार्षिक योजनेसाठी  125 कोटी 40 लक्ष रुपये अर्थसंकल्‍पीय तरतूद करण्‍यात आली असून, त्‍यापैकी 83 कोटी 92 लाख रुपये प्राप्‍त झाले आहे. जिल्‍हा वार्षिक योजनेमध्‍ये  प्राप्‍त झालेल्‍या  निधींचा विनीयोग विविध विकास कामासाठी  प्राधान्‍याने  करा अशा सुचना  जिल्‍हाधिकारी  श्रीमती जयश्री भोज यांनी  आज विभाग प्रमुखांना दिल्‍यात.
            जिल्‍हाधिकारी कार्यालयाचे  सभागृहात वर्धा जिल्‍हा वार्षिक योजनेच्‍या  विभागनिहाय खर्चाचा आढावा जिल्‍हाधिका-यांनी घेतला त्‍याप्रसंगी  विभाग प्रमुखांना मार्गदर्शन करताना त्‍या बोलत होत्‍या.
          जिल्‍हा वार्षिक योजने अंतर्गत 83 कोटी 92 लक्ष रुपयाचा निधी बीडीएस प्रणालीव्‍दारे   विभागप्रमुखांना उपलब्‍ध करुन दिला आहे. विभागप्रमुखांनी वार्षिक योजनेतील मंजूर कामे  त्‍वरीत सुरु करावी  व विभागांना मिळालेला 75 टक्‍के निधीमधून  विकासकामे  त्‍वरीत सुरु करुन मंजूर निधी  निर्धारीत कालावधीत खर्च होईल यादृष्‍टीने प्रयत्‍न करावेत अशा सुचनाही जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी यावेळी दिल्‍यात.
            जिल्‍हा वार्षिक योजनेमध्‍ये सर्वसाधारण योजनांसाठी  62 कोटी 47 लक्ष 64 हजार रुपये  तरतूद प्राप्‍त झाली असून, बीडीएस प्रणालीव्‍दारे  विभागप्रमुखांना वितरीत करण्‍यात आली आहे.  ऑगस्‍ट अखेर पर्यंत 16 कोटी 20 लक्ष रुपये खर्च झाले असून, विभागप्रमुखांनी  मंजूर झालेला निधी  खर्च करण्‍याच्‍या दृष्‍टीने नियोजन करावे, अशा सुचनाही  श्रीमती जयश्री भोज यांनी अधिका-यांना दिल्‍यात.
      अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत   5 कोटी  86 लक्ष 70 हजार रुपये निधी प्राप्‍त झाला आहे तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्रबाह्य योजने अंतर्गत  15 कोटी 57 लक्ष 85 हजार रुपयाचा निधी प्राप्‍त झाला असून यापैकी  8 कोटी 62 लक्ष 86 हजार  रुपये विभागप्रमुखांना वितरीत करण्‍यात आला आहे.
          जिल्‍ह्याच्‍या  सर्वांगिन विकासासाठी  जिल्‍हा वार्षिक योजनेमध्‍ये    प्राधान्‍यक्रमाने कृषी व संलग्‍न सेवेसाठी  16 कोटी 16 लक्ष 60 हजार रुपये , ग्रामीण विकास कार्यक्रमा अंतर्गत 20 कोटी  25 लक्ष 97 हजार रुपये, वाहतूक व दळणवळण योजने अंतर्गत 22 कोटी  60 लक्ष 2 हजार  रुपये तसेच  सामाजिक व सामुहिक सेवासाठी 52 कोटी 97 लक्ष 94 हजार रुपये, तसेच पाटबंधारे विकास,  विदृयूत विकास, उद्योग विकास, सर्वसाधारण आर्थिक सेवा आदि विभांगासाठी  125 कोटी 40 लक्ष रुपयाचा अर्थसंकल्‍पीय तरतूदीपैकी 83 कोटी 92 लक्ष रुपयाचा निधी  प्राप्‍त झाला असल्‍याचेही जिल्‍हाधिकारी जयश्री भोज  यांनी सांगितले.
          विभागप्रमुखांना बिडीएस व्‍दारे जिल्‍हा वार्षिक योजनेचा निधी वितरीत करण्‍यात आला असून, विभाग प्रमुखांनी  वार्षिक खर्चानुसार कॅशफ्लो प्रमाणे उपलब्‍ध होणारा निधी त्‍याच महिन्‍यात  खर्च करावा अशा सुचना करताना  प्रत्‍येक कामांना  तांत्रिक  तसेच प्रशासकीय मंजूरी  घेवूनच खर्चाचे नियोजन करावे, असेही  यावेळी जिल्‍हाधिकारी श्रीमती  भोज यांनी स्‍पष्‍ट  केले.
       प्रारंभी जिल्‍हा नियेाजन अधिकारी प्रकाश डायरे यांनी  स्‍वागत करुन वर्धा जिल्‍हा  वार्षिक योजनांसाठी अर्थसंकल्‍पीय तरतूद  तसेच या निधीच्‍या 80 टक्‍के    निधी  विभागप्रमुखांना बिडीएस व्‍दारे वितरीत करण्‍यात आला असला तरी एकूण उपलब्‍ध  झालेल्‍या निधीपैकी  विभागप्रमुखांनी 75 टक्‍के मर्यादेपर्यंतच खर्च करण्‍याचे निर्देश वित्‍त विभागाने दिले असल्‍याचे यावेळी सांगितले.
      यावेळी विभागातील सर्व वरिष्‍ठ अधिकारी  उपस्थित होते.
                                        0000000

No comments:

Post a Comment