Tuesday 11 September 2012

वर्धा जिल्‍ह्यात सरासरी 73.60 टक्‍के पाऊस; आर्वी व हिंगणघाट सर्वाधिक पाऊस


6 प्रकल्‍पात 100 टक्‍के तर 4 प्रकल्‍पात सरासरी 98 टक्‍के जलसाठा
      वर्धा, दि. 11- वर्धा जिल्‍ह्यात सरासरी  782.3 टक्‍के  पाऊस पडला असून, जिल्‍ह्यात एकूण 73.7 टक्‍के  पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत  85.4 टक्‍के  प्रत्‍यक्ष पावसाची नोंद झाली  होती.
            जिल्‍ह्यात काल वर्धा तालुक्‍यात  सर्वाधिक 71.4 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, देवळी 55 मि.मी., कारंजा 35 मि.मी. , आष्‍टी व आर्वी 22 मि.मी., समुद्रपूर 24 मि.मी., हिंगणघाट 36 मि.मी. तर सेलू तालुक्‍यात 20.5 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. जिल्‍ह्यात  एकूण 286.3 मि.मी. पाऊस पडला असून, सरासरी 35.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
             मागील आठवड्यात सतत पाऊस पडल्‍यामुळे  जिल्‍ह्यातील सर्वच तालुक्‍यात   सेलू वगळता  सर्व तालुक्‍यात अतिवृष्‍टी झाल्‍यामुळे  सर्व नदी व नाल्‍यांना पुर आला असून, प्रमुख सिंचन प्रकल्‍पांना पाण्‍याचा विसर्ग सुरु आहे.
       जिल्‍ह्यात सरासरी  782.3 मि.मी. म्‍हणजे  73.7 टक्‍के  पाऊस पडला आहे. आर्वी तालुक्‍यात सरासरी पेक्षा जास्‍त पावसाची नोंद झाली आहे.तालुकानिहाय पडलेला  एकूण पाऊस पुढील प्रमाणे आहे. वर्धा 804.6 मि.मी., सेलू 419 मि.मी., देवळी 708.3 मि.मी., हिंगणघाट 894,3 मि.मी., समुद्रपूर 877.4 मि.मी., आर्वी 1074 मि.मी., आष्‍टी  704मि.मी., कारंजा 776.4 मि.मी. एकूण सरासरी 782.3 मि.मी.. मागिल वर्षी  याच कालावधीत 906.3 मि.मी. पावसाची नोंद झाली होती म्‍हणजेच सरासरी 85.4  टक्‍के पाऊस जिल्‍ह्यात झाला होता.
                                    10 प्रकल्‍प ओव्‍हर फ्लो
            वर्धा जिल्‍ह्यातील   प्रमुख   15 सिंचन प्रकल्‍पापैकी  10 प्रकल्‍पांमध्‍ये   क्षमतेपेक्षा जास्‍त  जलसाठा निर्माण झाल्‍यामुळे  या प्रकल्‍पातून  विसर्ग सुरु झाला आहे. निम्‍न वर्धा प्रकल्‍पाचे  23 दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडण्‍यात आले असून, उर्ध्‍व वर्धा प्रकल्‍पाचे 9 दरवाजे 21 सेंटीमीटरने उघडण्‍यात आले आहे.
         जिल्‍ह्यातील 10 प्रकल्‍पामधून विसर्ग सुरु असून, यामध्‍ये धाम प्रकल्‍प महाकाली 100 टक्‍के  भरला असून, 119.52 क्‍युसेक पाणी  नदीत सोडण्‍यात येत आहे. पोथरा प्रकल्‍प  100 टक्‍के भरला असून, 23.18 क्‍युसेक  पाण्‍याचा विसर्ग सुरु आहे. पंचधारा प्रकल्‍प 100 टक्‍के भरला असून, 5.54 क्‍युसेक पाण्‍याचा विसर्ग सुरु आहे. मदन उन्‍नई  प्रकल्‍प 100 टक्‍के भरला असून, 16.20 क्‍युसेक पाण्‍याचा विसर्ग सुरु आहे. सुकळी लघु प्रकल्‍प 100 टक्‍के भरला असून, 12.21 क्‍युसेक पाण्‍याचा विसर्ग सुरु आहे.
         वडगाव प्रकल्‍प 97.43 टक्‍क्‍े  भरला असून, या प्रकल्‍पाची  3 दरवाजे 25 सेंटीमीटरने उघडण्‍यात आल्‍यामुळे 72.47 क्‍युसेक पाण्‍याचा विसर्ग सुरु आहे.  उर्ध्‍व वर्धा प्रकल्‍प   98.69 टक्‍क्‍े भरला असून, 308 क्‍युसेक पाण्‍याचा विसर्ग सुरु आहे. वर्धा कारनदी प्रकलप  100 टक्‍के  भरला असून, 19.55 क्‍युसेक पाणी सोडण्‍यात येत आहे. निम्‍न वर्धा प्रकल्‍पातून 472, बेंबळा प्रकल्‍पातून 415 क्‍युसेक पाणी सोडण्‍यात येत आहे.
                                                            0000000

No comments:

Post a Comment