Friday 14 September 2012

नागठाणा व रोठा येथे राज्‍यमंत्री रणजित कांबळे


यांच्‍या हस्‍ते  विकासकामांचे भुमिपूजन       

वर्धा, दि. 14-नागठाणा  येथे सुमारे  5 लक्ष 50 हजार    खर्च करुन बांधण्‍यात येणा-या अंगणवाउी ईमारतीच्‍या  बांधकामाचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांच्‍याहस्‍ते  झाला.
13 व्‍या वित्‍त आयोगामधून  नागठाणा येथे  अंगणवाडी  बांधकामाला मंजूरी मिळाली असून, इमारतीच्‍या बांधकामासोबत  लहान मुलांसाठी आवश्‍यक सुविधाही येथे उपलब्‍ध  होणार आहेत.      
यावेळी  पंचायत समितीचे सभापती  धैर्यशिल जगताप, जि.प. सदस्‍य छोटूभाऊ चांदूरकर, पंचायत समिती सदस्‍य विजय नरांजे, दिनकरराव लोखंडे, ग्रामसेवक संदीप भोसले आदी  उपस्थित होते.
सरपंच डॉ. विजय चौधरी यांनी  स्‍वागत करुन  नागठाणा येथे बांधण्‍यात येत असलेल्‍या अंगणवाडी संदर्भात प्रास्‍ताविकात उल्‍लेख केला. अंगणवाडी भूमीपुजन समारंभा निमित्‍त बसविण्‍यात आलेल्‍या कोनशिलेचे अनावरण राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांचे हस्‍ते झाले.
                           रोठा येथे दलित वस्‍ती  सुधार कामांचा शुभारंभ
रोठा ग्रामपंचायत अंतर्गत दलित वस्‍त्‍यांमध्‍ये  सिमेंट रसत्‍यांच्‍या  बांधकामाचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाम राज्‍यमंत्री  रणजित कांबळे यांच्‍या हस्‍ते आज झाला.
      यावेळी  जि.प.चे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वराव ढगे, सभापती  धैर्यशिलराव जगताप, सरपंच डॉ. विजय चौधरी आदी उपस्थित होते.
       दलित वस्‍ती सुधार कार्यक्रमा अंतर्गत रोठा या गावात सुमारे 1 लक्ष रुपये खर्च करुन सिमेंटच्‍या रस्‍त्‍याचे बांधकाम करण्‍यात येणार आहे.  सिमेंट रस्‍त्‍याच्‍या बांधकामाचा दर्जा उत्‍तम राहील याकडे लोकप्रतिनीधीनीही लक्ष देण्‍याची सुचना यावेळी राज्‍यमंत्री रणजित कांबळे यांनी दिली.
                                              000000   

No comments:

Post a Comment