Monday 10 September 2012

बायोडायव्‍हरसिटी स्‍पेशल सायन्‍स रेल्‍वे एक्‍स्‍प्रेस वर्धेला येणार


     
* समृध्‍द जैवविविधतेचे अनोखे दर्शन
* विदर्भातील अभ्‍यासकांना सुवर्ण संधी
* विशेष वातानूकुलीत रेल्‍वेचे ऑक्‍टोंबरमध्‍ये आगमण
* राज्‍यात केवळ पांच रेल्‍वे स्‍थानकावरच प्रदर्शन पाहण्‍याची संधी

       वर्धा, दि. 10- भारतातील समृध्‍द जैवविविधतेचे दर्शन घडविण्‍याच्‍या  दृष्‍टीने   जैवविविधते संबंधी  परिपूर्ण माहिती असलेले  अनोखे प्रदर्शन  सायन्‍स एक्‍स्‍पेस –     बायोडायव्‍हरसिटी स्‍पेशल  ही  सोळा वातानुकूलीत  डब्‍बे असलेल्‍या  रेल्‍वे गाडीचे आगमण  20 ऑक्‍टोंबर रोजी    सेवाग्राम रेल्‍वे स्‍थानकावर  होत आहे.
         राज्‍यात  सायन्‍स एक्‍स्‍प्रेस  ही स्‍पेशल रेल्‍वे गाडी केवळ पाच  रेल्‍वे स्‍थानकावरच थांबणार असून, वर्धा, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, अकोला जिल्‍ह्यातील  पर्यावरण प्रेमी , शिक्षक तसेच विद्यार्थ्‍यांनाही  देशातील समृध्‍द जैवविविधतेची माहिती जाणून घेण्‍याची  सुवर्ण संधी उपलब्‍ध होणार आहे. सेवाग्राम रेल्‍वे स्‍थानकावर या विशेष  सायन्‍स एक्‍स्‍प्रेस  दिनांक 20 ऑक्‍टोंबर ते 22 ऑक्‍टोंबर पर्यंत थांबणार असून, सोळा  वातानुकूलीत  रेल्‍वे  कोचमध्‍ये  असलेले  प्रदर्शन सकाळी  10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वर्धेकरांना व विदर्भातील पर्यावरण प्रेमींना पाहता येणार आहे. हे प्रदर्शन निःशुल्‍क राहणार असल्‍याची   माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक प्रविणकुमार बडगे  यांनी दिली.
      देशातील   22 राज्‍यामधील  निवडक आणि महत्‍वाच्‍या  52 रेल्‍वे स्‍थानकावर जैवविविधते संदर्भात प्रदर्शन पाहण्‍याची संधी मिळणार असून, यामध्‍ये राज्‍यातील खडकी (पुणे ), मुंबई (सीएसटी), नागपूर  आणि सेवाग्राम (वर्धा) या रेल्‍वेस्‍थानकावर  विशेष  सायन्‍स  एक्‍स्‍प्रेस  रेल्‍वे  थांबणार आहे. 11 व्‍या कॉन्‍फरन्‍स   ऑफ  पार्टीजचे यजमान पद  भारताने  स्विकारले असून, या निमित्‍याचे  औचित्‍य साधून   समृध्‍द  जैवविविधतेचे दर्शन घडविण्‍याच्‍या दृष्‍टीने  व जैवविविधतेची माहिती पोहचविण्‍यासाठी  16 वातानूकुलीत डब्‍बे असलेली  सायन्‍स एक्‍स्‍प्रेस बायोडायव्‍हरसिटी   ही रेल्‍वे जून ते डिसेंबर  या दरम्‍यान संपूर्ण भारतात भ्रमंती करणार आहे.
          विदर्भातील विशेषतः वर्धा जिल्‍ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांनीही   या प्रदर्शनीस भेट द्यावी, असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचाकल प्रविणकुमार बडगे  यांनी केले आहे. 
                                                00000

No comments:

Post a Comment