Friday 7 September 2012

पायका क्रीडा कार्यक्रमा अंतर्गत ग्रामपंचायत स्‍तरावर क्रीडांगण - जयश्री भोज


                  

* पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान पुस्तिकेचे प्रकाशन
* 104 ग्रामपंचायतींना प्रत्‍येकी  एक लक्ष रुपये

          वर्धा, दि. 7 -  ग्रामपंचायत स्‍तरावरील उदयन्‍मुख  खेळांडूसाठी  तसेच ग्रामीण भागात खेळाबद्दल  आवड निर्माण व्‍हावी यासाठी  पायका क्रीडा कार्यक्रमा अंतर्गत  प्रत्‍येक ग्रामपंचायत स्‍तरावर  एक लक्ष रुपये खर्च करुन क्रीडांगण बांधण्‍यात येणार आहे. ग्रामीण भागातील  विदृयार्थ्‍यांनी   या क्रीडांगणाचा  लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी   जयश्री भोज यांनी केले आहे.
      पायका क्रीडा कार्यक्रमा अंतर्गत पंचायत युवा क्रीडा व  खेळ अभियान  माहिती पुस्तिकेचे प्रकाशन  जिल्‍हाधिकारी   जयश्री  भोज यांच्‍या   हस्‍ते   झाले त्‍याप्रसंगी   मार्गदर्शन करताना श्रीमती भोज बोलत होते.
          जिल्‍हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात  आयोजित प्रकाशन सोहळ्यास जिल्‍हा  माहिती अधिकारी अनिल गडेकर, जिल्‍हा  क्रीडा अधिकारी  प्रदीप शेटीये उपस्थित होते.
          जिल्‍ह्यात  पायका  योजने अंतर्गत  2008-09  यावर्षी   52 तसेच 2 009-10  यावर्षी   52   अशा  104   ग्रामपंचायतीची निवड करुन त्‍यांना प्रत्‍येकी  एक  लक्ष  रुपयाचे  अनुदान क्रीडांगण विकासाकरीता थेट ग्रामपंचायतींना  वितरीत करण्‍यात आले आहे. पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियाना अंतर्गत ग्राम पातळीपासून पाच क्रीडा स्‍पर्धाचे आयोजन करण्‍यात येणार असून, ग्रामपंचायतींनीही या क्रीडा स्‍पर्धामध्‍ये  सहभागी होण्‍याचे आवाहन यावेळी जिल्‍हाधिकारी  जयश्री भोज यांनी दिले आहे.
           जिल्‍हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये यांनी  स्‍वागत   करुन प्रास्‍ताविकात   केन्‍द्र शासनाच्‍या मदतीने   पंचायत युवा  क्रीडा व खेळ अभियाना अंतर्गत ग्रामीण भागात प्राथमिक स्‍वरुपाच्‍या क्रीडा सुविधा निर्माण करण्‍यासाठी ग्रामपंचायत स्‍तरावर क्रीडांगण विकासाकरीता एक लक्ष रुपयाचे अनुदान  मंजूर  केले आहे. पायका योजनेच्‍या  निकषानुसार    प्रत्‍येक   तालुक्‍यातील   10 टक्‍के   ग्रामपंचायतीची निवड करण्‍यात येवून शासनास अनुदान मंजूरीसाठी कृती आराखडा सादर करण्‍यात आला असल्‍याची माहिती प्रदीप शेटीये यांनी दिली.
          यावेळी   क्रीडा अधिकारी  अनिल बोरवा, माहिती अधिकारी  मिलींद  आवळे आदी उपस्थित होते.
                                          000000000      
                                                          

No comments:

Post a Comment