Sunday 2 September 2012

हातमाग पध्‍दतीचे थाटात उदघाटन हातमाग कापड प्रदर्शनी तालुका स्‍तरावरही -आकाश शेंडे


वर्धा दि.2 -  ग्रामीण क्षेत्रातील बेरोजगारांना रोजगार मिळून देण्‍यासाठी हातमाग उद्योग व्‍यवसाय महत्‍वाची कामगीरी बजावत असते, या व्‍यवसायाला गौरवशाली परम्‍परा असून या व्‍यवसायाची व्‍याप्‍ती  वाढवून देण्‍यासाठी प्रत्‍येक तालुक्‍यात हातमाग कापड प्रदर्शनी लावण्‍यात यावी असे प्रतिपादन येथील नगराध्‍यक्ष आकाश शेंडे यांनी केले.    
          येथील सार्वजनिक वाचनालय येथे विकास आयुक्‍त हातमाग वस्‍त्रोद्योग विभाग, भारत सरकार व वस्‍त्रोद्योग विभाग, महाराष्‍ट्र शासन यांनी प्रायोजित केलेल्‍या जिल्‍हास्‍तरीय हातमाग कापड प्रदर्शनीचे त्‍यांचे ह्रस्‍ते उदघाटन झाले.त्‍या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्‍हा उपनिबंधक जयसिंग ठाकूर व जिल्‍हा माहिती अधिकारी पी.जे.गडेकर व वस्‍त्रोद्योग विभागाचे प्रदर्शनी प्रमुख वासुदेव मेश्राम आदि मान्‍यवर उपस्थित होते.
कृषी उद्योगानंतर हातमाग हा देशातील जास्‍तीत जास्‍त बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारा व्‍यवसाय असल्‍याचे सांगून नगराध्‍यध्‍य शेंडे म्‍हणाले की, एकेकाळी हातमाग कापड हा सर्व सामान्‍य लोकांचा आवडणारा कापड होता आता नव्‍या यंत्रयुगात या उद्योगाला कमी महत्‍व प्राप्‍त होत आहे. या उद्योगाच्‍या वाढीसाठी व गेलेली वैभवशाली परंपरा पुन्‍हा स्‍थापित करण्‍यासाठी शासन पुरेशा उपाय योजना करण्‍या सोबत  हातमाग कापडाचे प्रदर्शन प्रत्‍येक तालुक्‍याच्‍या ठिकाणी लावण्‍याची गरज आहे असेही ते म्‍हणाले.
याप्रसंगी उपनिबंधक ठाकूर यांनी हातमाग उद्योगामुळे बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळते तसेच ग्रामीण लोकांच्‍या कलागुणांना सुध्‍दा मोठया प्रमाणावर वाव मिळतो असेही ते म्‍हणाले .
         यावेळी बोलतांना जिल्‍हा माहिती अधिकारी गडेकर म्‍हणाले की, विदर्भातील नागपूर हे हातमाग कापड व साड्यांसाठी प्रसिध्‍द होते. आता कापड उद्योगात स्‍पर्धा वाढली आहे.या स्‍पर्धेला तोंड देण्‍यासाठी हातमाग उद्योगांनी पुरेशा उपाय योजना करुन ग्राहकांच्‍या मागणीनुसार कापड उत्‍पादित करुन या उद्योगाला चालना द्यावी असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.
            हातमाग कापड प्रदर्शनी 10 सप्‍टेंबर,2012 पर्यन्‍त सकाळी  11 ते रात्री 8.30 वाजेपर्यन्‍त उघडी राहणार असून या प्रदर्शनात महाराष्‍ट्रातील कानाकोप-यातील विणकर संस्‍थांनी भाग घेतला आहे. सुंदर कला कुसरीच्‍या पारंपारीक कापडाचे वैभवशाली उत्‍पादन विक्रीस ठेवण्‍यात आले आहे.सदर प्रदर्शनीमध्‍ये बेडशिट,चादर ,टावेल, नॅपकीन, कर्टन क्‍लाथ, टसर सिल्‍क व कॉटन साड्या ड्रेस मटेरियल इत्‍यादी  माल विक्रीसाठी उपलब्‍ध असल्‍याचे यावेळी सांगण्‍यात आले.
            कार्यक्रमाचे संचालन व आभार वासुदेव मेश्राम यांनी केले.   
0000

No comments:

Post a Comment