Friday 7 September 2012

गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा अंतर्गत सहा सोनोग्राफी केन्‍द्राविरुध्‍द कारवाही


                
                                  
                   * पीसीएनडीटी दक्षता समितीची  बैठक
              * सोनोग्राफी केन्‍द्राची  नियमित तपासणी करा
             * स्‍त्री भ्रृणहत्‍या टाळण्‍यासाठी जागृती मोहीम
      वर्धा, दिनांक 7 - गर्भधारणापूर्व  आणि प्रसवपूर्व  निदान  प्रतीबंधक  कायद्याअंतर्गत जिल्‍ह्यातील सहा  सोनोग्राफी केन्‍द्रांना  बंद केले असून, या केन्‍द्राविरुध्‍द   कारवाही  सुरु आहे. तसेच जिल्‍ह्यातील चार  गर्भपात केन्‍द्रही  बंद करण्‍यात  आली आहेत. स्‍त्री भ्रृण हत्‍या टाळण्‍यासाठी  जिल्‍ह्यात जनतेमध्‍ये जागृती करण्‍यासाठी  विशेष मोहीम राबविण्‍यात येणार असल्‍याची माहिती  निवासी उपजिल्‍हाधिकारी   सुनील गाडे यांनी दिली.
            पीसीएनडीटी  दक्षता समितीची बैठक जिल्‍हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात आयोजीत करण्‍यात आली होती. यावेळी  जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक  डॉ. सोनवणे , डॉ. जे.एन.शर्मा, लिगल सेलच्‍या प्रमुख अॅड. कांचन बडवाईक , जिल्‍ह्यातील सर्व उपविभागीय महसूल अधिकारी, तहसिलदार, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, शिक्षणाधिकारी  उपस्थित होते.
           गर्भलिंग निवड प्रतिबंधक कायद्या अंतर्गत जिल्‍ह्यात  सोनोग्राफी तसेच गर्भपात केन्‍द्रांची नियमित  तपासणी करण्‍यात येत असून, ज्‍या केन्‍द्रांवर अनियमितता तसेच  संशयास्‍पद  दस्‍ताऐवज  आढळल्‍यास त्‍यांच्‍याविरुध्‍द कठोर कारवाही  करण्‍यात येत असल्‍याचे सांगताना जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. सानवणे म्‍हणाले की, जिल्‍ह्यात 33 सोनोग्राफी केन्‍द्र असून , यापैकी सहा केन्‍द्राविरुध्‍द   कारवाही  करुन  हे सर्व  प्रकरणे  जिल्‍हा न्‍यायालयाकडे  न्‍यायप्रविष्‍ठ आहेत. तसेच  45  गर्भपात केन्‍द्र असून , चार केन्‍द्राविरुध्‍द  कारवाही करुन  ही केन्‍द्र  बंद करण्‍यात आली आहेत.
          जिल्‍ह्यात  स्‍त्री भ्रृण हत्‍या टाळण्‍याच्‍या अनुषंगाने   सामाजिक  संस्‍थाचे सहकार्य घेण्‍यात येत असून, शालेय महाविद्यालयीन स्‍तरावर चित्रकला व निबंध स्‍पर्धा आयेाजीत करण्‍यात आल्‍या आहेत. तसेच  भिंतीचित्र स्‍पर्धाचेही  आयेाजन करण्‍यात आले  असल्‍याची माहिती  डॉ. सोनवणे यांनी दिली.
             मुलगी वाचवा या अभियाना अंतर्गत  टोलफ्री नंबरवर दोन तक्रारी प्राप्‍त झाल्‍या असून  त्‍या तक्रारीची दखल घेण्‍यात आली आहे. mulgi.com   या वेबसाईडवरही प्राप्‍त  होणा-या तक्रारीची दखल घेण्‍यात आली आहे. जिल्‍ह्यातील तसेच तालुकास्‍तरावर असलेल्‍या सोनोग्राफी केन्‍द्र, एमटीपी केन्‍द्र यांची नोंदणी  अनिवार्य असून नुतणीकरणाबाबतही  आदेश देण्‍यात आले आहे. या केन्‍द्रांना दर तीन महिन्‍यानी  भेटी तपासणी  करण्‍यात  आल्‍याची माहितीही यावेळी देण्‍यात आली.
                     गरोदर मातांची तपासणी करणार
       जिल्‍ह्यातील  गरोदर मातांची  तपासणी  करुन त्‍यांची नोंदणी अनिवार्य करण्‍यात आली आहे. जिल्‍हा व ग्रामीण रुग्‍णालयात   यासंदर्भात कारवाही सुरु असून इतर दवाखान्‍यातही    नोंदणीबाबत सुचना देण्‍यात येणार असल्‍याचेही या बैठकीत सांगण्‍यात आहे.
          प्रारंभी पीसीएनडीटी लिगल सेलच्‍या प्रमुख कांचन बडवाईक यांनी  गर्भलिंग निदान तपासणी प्रतिबंधक कायद्या अंतर्गत जिल्‍ह्यात  सुरु असलेल्‍या  विविध उपक्रमाची  माहिती दिली.
          यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हिवलेकर, डॉ. दामट, एक्‍सरेतज्ञ डॉ. जे.एन.शर्मा, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी  यांनी सोनोग्राफी केन्‍द्रांची तपासणी करताना महसूल अधिकारी व पोलीस यांनीही  उपस्थित राहून कठोरपणे तपासणी करण्‍याचे दृष्‍टीने सहकार्य करावे अशी सुचनाही केली.
          यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. दामट यांनी आभार मानले.                                                                    0000000


No comments:

Post a Comment