Tuesday 4 September 2012

आधार नोंदणी मध्‍ये वर्धा जिल्‍हा आघाडीवर


वर्धा दि.4-  आधार नोंदणीमध्‍ये राज्‍यात वर्धा जिल्‍ह्याने उकृष्‍ट कार्य केले असून जिल्‍ह्यातील एकूण 12 लाख 99 हजार 592 लोकसंखेपैकी 10 लाख 54 हजार 743 लोकांनी आधरची नोंदणी केली आहे.
          जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी राबविलेल्‍या नियोजनबध्‍द  अभियानामुळे वर्धा जिल्‍ह्यातील आठ तालुक्‍यात  आधार नोंदणीला जनतेनेही उत्‍फूर्त  प्रतिसाद दिला आहे.जिल्‍ह्यात केवळ 2 लाख 44 हजार 849 आधारची नोंदणी शिल्‍लक असून सप्‍टेंबर पासून पुन्‍हा नोंदणी साठी तालुका व ग्रामस्‍तरावर विशेष कॅम्‍प आयोजित करण्‍यात येत आहेत.
            आधार नोंदणीसाठी  जनतेमध्‍ये केलेल्‍या विशेष जागृती व अभियानामुळे हा कार्यक्रम यशस्‍वी ठरला आहे. जिल्‍ह्यात तालुका निहाय आधार नोंदणी व कंसात लोकसंख्‍या पुढील प्रमाणे आहे.
            वर्धा तालुका 2,89,635 (3,57,437) सेलू 1,12,876 (1,29,579) देवळी 1,29,803 (1,59,706) हिंगणघाट 1,85029 (2,23,411) समुद्रपूर 93,560 (1,16,991) आर्वी 1,15,236 (1,45,887) आष्‍टी 63,236 (76,186) व कारंजा घाडगे तालुक्‍यात  65,368 आधाराची नोंदणी झाली आहे.
            जिल्‍ह्यात 2 लाख 44 हजार 849 आधारची नोंदणी अद्याप शिल्‍लक असून सप्‍टेंबर व ऑक्‍टोंबर या तीन महिन्‍यात विशेष अभियानाव्‍दारे ही नोंदणी पूर्ण करण्‍यात येत आहे.आधार नोंदणी साठी जिल्‍ह्यातील जनतेकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी दिली.
0000

No comments:

Post a Comment