Thursday 6 September 2012

प्रज्ञावंत विद्यार्थी घडविण्‍यासाठी शिक्षकांनी अथक परिश्रम करण्‍याची गरज- ज्ञानेश्‍वर ढगे


     
·        दोन शिक्षकांना राज्‍यस्‍तरीय पुरस्‍कार 
·        आठ तालुक्‍यातील आठ शिक्षकांना जिल्‍हास्‍तरीय पुरस्‍कार प्रदान
    वर्धा, दि. 5 – ग्रामीण व शहरी क्षेत्रामध्‍ये अनेक गरीब विद्यार्थी  जि.प.च्‍या शाळेमधून शिक्षण घेत असतात. शासनाने  या विद्यार्थ्‍यांसाठी अनेक सोयी व सुविधा उपलब्‍ध  करुन दिलेलया आहेत. स्‍पर्धेच्‍या यंगात या विदृयार्थ्‍यांमध्‍ये गुणात्‍मक बदल , आत्‍मनिर्भयपणा व प्रज्ञावंत विदृयार्थी घडविण्‍यासाठी शिक्षकांनी अधिक  परिश्रम करण्‍याची गरज आहे असे प्रतिपादन जि.प.चे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे यांनी केले.
भारताचे माजी राष्‍ट्रपती सर्वपल्‍ली  राधाकृष्‍ण यांचा जन्‍मदिवस शिक्षक दिवस म्‍हणून साजरा केल्‍या जातो. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणा-या गुरजनाविषयी कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यासाठी जि.प.च्‍या शिक्षण विभागामार्फत येथील विकास भवनामध्‍ये आज शिक्षक दिन मोठ्या उत्‍साहात साजरा करण्‍यात आला त्‍याप्रसंगी ते अध्‍यक्ष पदावरुन बोलत होते.
यावेळी जि.प.चे उपाध्‍यक्ष संजय कामनापूरे शिखण सभापती प्रा. उषाकिरण थुटे, समाज कल्‍याण सभापती नंदकिशोर कंगाले, महिला व बालकल्‍याण सभापती निर्मलाताई बिजवे, अर्थ व बांधकाम सभापती गोपाल कालोकर, जि.प.सदस्‍य मिलिंद  भेंडे व पंचायत समितीचे पदाधिकारी  व सदस्‍य मंचावर उपस्थित होते.
 चारित्र संपन्‍न व सामर्थ्‍यशाली राष्‍ट्र घडविण्‍यासाठी शिक्षकाचे महत्‍वपूर्ण योगदान असते असे सांगून जि.प. अध्‍यक्ष ढगे म्‍हणाले की विदृयार्थ्‍यांमध्‍ये राष्‍ट्र उभारणीचे  तसेच प्रतिष्‍ठा  उंचावण्‍याची जबाबदारी पार पाडण्‍यासाठी शिक्षक महत्‍वपूर्ण कार्य करु शकतात. अनेक विद्यार्थ्‍यांमध्‍ये सुप्‍त गुण असतात. या सुप्‍त गुणांना योग्‍य असे मार्गदर्शन शिक्षक देवू शकतात. जिल्‍ह्यात शाळांमध्‍ये संगणकाची सुविधा उपलब्‍ध  असून संगणकाचे ज्ञान विदृयार्थ्‍यांमध्‍ये रुजविण्‍यासाठी शिक्षकांनी प्रयत्‍न केले पाहीजे असेही ते म्‍हणाले.
 याप्रसंगी शिक्षण सभापती प्रा. थुटे म्‍हणाल्‍या की विद्यार्थ्‍यांमध्‍ये चांगले संस्‍कार  रुजविण्‍याची गरज असून भविष्‍यामध्‍ये   गुणवंत विदृयार्थी घउू शकतील. शिक्षकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. स्‍पर्धेच्‍या  युगात जि.प.शाळेमध्‍ये विदृयार्थ्‍यांची पटसंख्‍या टिकवायच्‍या असतील तेव्‍हा शिक्षकांनीसुध्‍दा परिश्रम घ्‍यावे लागतील. चांगले व सुसंसकृत व हुशार विद्यार्थी घडविण्‍याची जबाबदारी शिक्षकांनी स्विकारावी असे आवाहन त्‍यांनी याप्रसंगी केले.
 यावेळी उपाध्‍यक्ष श्री. कामनापुरे  म्‍हणाले की शिक्षण क्षेत्राचा व्‍यवसाय पवित्र आहे. त्‍याचे पावित्र जपण्‍यासाठी आवश्‍यक ती काळजी घेण्‍याची गरज असून गुणवंत विद्यार्थी घडविण्‍यात यावे असे आवाहन त्‍यांनी यावेळी केले.
 यावेळी जि.सदसय मिलिंद भेंडे यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी राज्‍यस्‍तरीय पुरस्‍कारांसाठी जिलह्यातून दोन शिक्षकाची निवड करण्‍यात आली त्‍यामध्‍ये प्राथमिक विभागात वंदना येनुरकर व माध्‍यमिक विभागात प्रदिप गौतम  यांचा समावेश आहे. जिल्‍हास्‍तरावर आठ पंचायत समित्‍या मधून प्रत्‍येकी एका शिक्षकाची निवड पुरसकारासाठी करण्‍यात आली असून त्‍यामध्‍ये चेतना आष्‍टनकर वर्धा, गोविंद कावळे सेलू, विश्‍वमित्र सेंदूरसे देवळी, प्रमोद बोरकर हिंगणघाट, शेषराव भोंगाडे समुद्रपूर, मेघा तुपकर आर्वी, लक्ष्मिकांत काकपुरे आष्‍टी व राजेंद्र धार्मिक कारंजा यांचा समावेश आहे. त्‍यांना मान्‍यवरांचे हसते शाल, श्रीफळ, पुष्‍पगुच्‍छ,प्रमाणपत्र  व स्‍मृतीचिन्‍ह देवून गौरविण्‍यात आले तसेच पूर्व माध्‍यमिक शिष्‍यवृत्‍ती  परीक्षेमधील 49 गुणवंत प्राप्‍त विदृयार्थी व माध्‍यमिक शिष्‍यवृत्‍ती मध्‍ये परिक्षेत्रामध्‍ये 28 गुणवंत प्राप्‍त विदृयार्थ्‍यांना स्‍मृती चिन्‍ह व पुष्‍पगुच्‍छ  देवून मान्‍यवरांकडून गुणगौरव करण्‍यात आला.
     तत्‍पूर्वी माजी राष्‍ट्रपती सर्वपल्‍ली राधाकृष्‍ण व क्रांती ज्‍योती सावीत्रीबाई फुले यांच्‍या प्रतीमेला माल्‍यार्पण व दिप प्रज्‍वलीत करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्‍यात आली.
      यावेळी केंद्रीय मंत्री कपिल सिब्‍बल यांनी पाठविलेल्‍या संदेशाचे वाचन गटशिक्षणाधिकारी डी.वाय.तेलंग यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन संजय चौधीर व संध्‍या सांयकार यांनी तर प्रास्‍ताविक शिक्षणाधिकारी हरिदास बांबोर्डे व आभार श्री. मेश्राम यांनी मानले.
   याप्रसंगी शिक्षणाधिकारी लक्ष्मिनारायण सोनवणे यांचेसह जिल्‍हृयातील जि.प.व पं.स.चे पदाधिकारी व सदस्‍य, शिक्षक , केंद्र प्रमुख व मोठ्या संख्‍येने शिक्षक उपस्थित होता.
                         0000



No comments:

Post a Comment